ताज्या घडामोडी

निष्क्रिय जातपडताळणी विभागाद्वारे आदिवासी ग्रा.प सदस्यावर अन्याय – : अरविंद सांदेकर

मुख्य संपादक:कु. समिधा भैसारे

मागील ग्राम पंचायत सार्वत्रिक २०२१ च्या निवडनुकी मध्ये चंद्रपुर , गडचिरोली जिल्ह्यातील ग्राम पंचायत निवडनुकी मध्ये अनु:जमाती प्रवर्गामधुन आदीवासी समुदायातील अनेक लोकांनी निवडनुका लढविल्या आणि विजयी झाले .
निवडनुक लढविण्याच्या आधी निवडनुक आयोगाने निवडणुकीचे फार्म भरतांना जात पडताळणी वेधता प्रमान पत्र अथवा टोकन जोडावी व एक वर्षात वैधता प्रमान पत्र सादर करण्याचे आदेश दिले त्या आधारावर अनु: जमातीतील लोकांनी जात पडताळणी वैधता प्रमान पत्र मिळण्याकरीता आवश्यक कागद पत्रे आँनलाईन केली आणि जात पडताळणी विभागाकडे कागद पोहचता करीत त्या टोकन च्या आधारावर निवडणुकी करीता फार्म भरुन निवडणुक लढवली परंतु गढ़चिरोली येथिल जात पडताळणी विभागाच्या निषक्रीयतेमुळे एक वर्षात अजुनही वैधता प्रमानपत्र अनु : जमातीतील आदीवासी लोकांना मिळालेली नाही अथवा कुठलाही कागदपत्राच्या त्रुटी विषयी नोटीस द्वारे सुचना देण्यात आलेली नाही आणि एक वर्ष होत असतांना सुध्दा आँनलाईन वर प्रोसेडीग मध्ये दाखवित असुन प्रकरने प्रलंबित आहेत आधिच गरीबी ने ग्रासलेला समाज असल्याने कशीतरी निवडनुक लढवली त्यात ही मासिक भत्ता फार कमी असल्याने गढ़चिरोली येथे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी शे दोनशे कि मि वारवांर प्रवास करून जाण्याने आर्थिक बाबीने परीपुर्ण खचलेला असुन निष्क्रिय जात पडताळणी विभागाद्वारे आदिवासी ग्रा . प सदस्यावर अन्याय होत आहे . निवडणुकी ( ग्रापनी ) तहसिलदार द्वारे सात दिवसाच्या वैधता प्रमानपत्र सादर करण्याचे आदेश दीले असल्याने आदीवासीवर ग्राम पंचायतीतील सदस्यत्व जाण्याची नामुष्की आलेली आहे याला सर्रस्वी जवाबदार जातपडताळणी विभाग असुन आदीवासी सदस्या वर होणारा अन्याय थाबंण्यासाठी निवडणुक अधिका-यांनी वैधताप्रमान पत्र जात पडताळणी विभागाद्वारे मिळेपर्यत आदिवासी सदस्याचे ग्रा . प सदस्यत्व रद्द करण्यात येवू नये . व पडताळणी विभागाने प्रलंबित प्रकरने तात्काळ निकाली काढुन वैधता प्रमानपत्र देण्याचे करावे . अन्यथा वंचित बहुजन आघाड़ी द्वारे तिव्र आंदोलन करण्यात येईल असे आवाहन पुर्व विदर्भ समन्वयक अरविंदभाऊ सांदेकर यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close