ताज्या घडामोडी

आम आदमी पार्टीचे नवीन सभासद जोडणी अभियान

उपसंपादक :विशाल इन्दोरकर

नागपुर महानगर पालिकेच्या येणाऱ्या “मनपा निवडणूक – २०२२ आप चा महापौर” हे अभियान पूर्ण करण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त आम आदमी पार्टीची सदस्यता घेण्यासाठी तसेच पक्ष विस्तार , येणाऱ्या निवडणुकीत जास्तीतजास्त नगरसेवक हे आम आदमी पार्टीचे निवडून यावेत हे उद्दिष्ट समोर ठेवून दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रात
दिनांक १९/०८/२०२१ ला सकाळी ७:३० वाजता नागपूर सुधार प्रन्यास बगीचा, दत्तात्रय नगर, नागपूर येथे श्री. सुरेंद्र समुंद्रे, संयोजक, दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्र, ह्यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉ. शाहिद अली जाफरी जी ह्यांच्या मार्गदर्शनात कर्तव्यनिष्ठ, तसेच मा. अरविंद जी केजरीवाल ह्यांच्या देशव्यापी नेतृत्वावर विश्वास असणाऱ्या आणि नागपूर शहर व आपल्या परिवाराच्या उज्ज्वल भविष्यासाठी जनतेला पक्ष सदस्यता जोडणी अभियानात सहभागी करून सदस्यता अभियान राबविण्यात आले. ह्या अभियानात जनतेचा भरघोष प्रतिसाद मिळाला आणि अनेकांनी सदस्यता घेतली.

ह्या कार्यक्रमास पक्षाचे पदाधिकारी डॉ. शाहिद अली जाफरी सर – प्रभारी, सुरेंद्र समुंद्रे संयोजक, संजय अनासाने ऑटो विंग अध्यक्ष, बालू बनसोड सह सचिव, दिनेश चन्दनकर – सोशल मीडिआ अध्यक्ष, विशाल मानकर – प्रभाग 34 अध्यक्ष, अर्चना शेम्बेकर – वार्ड अध्यक्ष, अनिल सोनकुसले – वार्ड संगठन मंत्री, मुन्ना तिवारी – मीडिया प्रभारी, अमोल मुडे – इवेंट मैनेजमेंट
व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close