श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयात दहावी विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न

स्व आशा भावसार कला पुरस्कार वितरण.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
माजलगाव येथील श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा (निरोप) समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाचे कार्यवाह अमरनाथ खुर्पे, प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण तज्ञ महेश पाटील तर व्यासपीठावर संकुलाचे अध्यक्ष प्रकाश दुगड, माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष प्रेमकिशोर मानधने, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात सांघिक पद्य व माता सरस्वती पूजनाने झाली. यावेळी कला विभागाच्या वतीने प्रति वर्षी दिला जाणारा स्व आशा भावसार कला पुरस्काराने चि मोगल अथर्व, चि निल प्रदिप भडके, कु अपूर्वा जोशी, कु श्रीशा देशमुख या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते कला विभागाच्या वतीने चित्र मंजिरी या कला विभागाच्या ४२ व्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच शिक्षण विवेक अंकाच्या वतीने राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार प्राप्त श्रीमती सत्यभामा मोरे यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात चि कौस्तुभ लड्डा, चि जयंत काशिद, कु समृद्धी देशमुख, कु प्रजिता वनवे या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणी विषयी मनोगत व्यक्त केले. यानंतर श्रीमती सुनंदा खांडेकर व रवींद्र खोडवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, दहावी परीक्षा म्हणजे जीवनाला कलाटणी देणारा क्षण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवुन परीक्षेस आनंदाने सामोरे जावे तसेच परीक्षेसाठी व भावी काळातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे महेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना दहावी परीक्षा पद्धती, उत्तर पत्रिका सोडणे तसेच भावी काळातील वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाचे व अभ्यासपुर्ण मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात अमरनाथ खुर्पे यांनी सांगितले की, श्री सिध्देश्वर विद्यालयात फक्त गुणवंत विद्यार्थी घडवले जात नसून ज्ञानवंत विद्यार्थी घडवले जातात आपण मार्कवादी न राहता ज्ञानाची भूक आपली कायम असली पाहिजे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दहावी प्रमुख अतुल मुगळीकर, आभार व सुत्रसंचालन श्रीमती सुरेखा गवळी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने झाली. शांती मंत्र रवींद्र खोडवे यांनी सांगितला. यावेळी इयत्ता १० वी चे सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.