नवरत्न स्पर्धेत गंगासागर हेटी शाळेचे उज्वल यश

तालुका प्रतिनिधी:प्रा.विश्वनाथ मस्के नागभीड
नागभीड पंचायत समिती अंतर्गत केंद्रस्तरीय नाविण्यपूर्ण ‘नवरत्न स्पर्धा – 2025’ दि. 29 डिसेंबर 2025 रोजी केंद्र शाळा बाळापूर येथे उत्साहात पार पडल्या.
या स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गंगासागर हेटी येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

कथाकथन स्पर्धेत कु. गुंजन थेरकर,
एकपात्री भूमिका अभिनय स्पर्धेत कु. ताशी बारसागडे,
तर बुद्धिमापन स्पर्धेत कु. किर्ती कामडी हिने प्रथम क्रमांक मिळविला.
तसेच संयमस्फूर्त भाषण स्पर्धेत कु. आरोषी डेकाटे
आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत कु. किर्ती कामडी हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
संपूर्ण पालकवर्गाकडून त्यांचे कौतुक होत आहे.
या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. चनफणे सर तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री. अनरसकर सर, जिभकाटे सर, सायंकार सर व देशमुख मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व कलागुण विकासासाठी शुभेच्छा दिल्या.









