महाशिवरात्री निमित्त देवदर्शनासाठी गेलेल्या आई व मुलाचा वर्धा नदी पात्रात बुडून मृत्यू
मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईचाही अंत
तालुका प्रतिनिधी:महेश शेंडे गोंडपिपरी
महाशिवरात्रीनिमित्त आंघोळीसाठी गेलेल्या आई आणि मुलाचा वर्धा नदिपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना गोंडपीपरी तालुक्यातील सकमुर -लोनवली येथील वर्धा नदी पात्रता घडली आहे. अंघोळी करिता वर्धा नदी पात्रात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने माय-लेकाचा वर्धा नदी पात्रातील पाण्यात बुडुन मृत्यू झाला. नदी पात्रात आंघोळी करिता आधी मुलगा उतरला असता तिथे पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने तो खोल पाण्यात बुडायला लागला मुलगा पाण्यात बुडत असल्याचे समजताच आईने पाण्यात उडी घेतली.
मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आईचाही पाण्यात बुडून दुर्दवी अंत झाला.
मृतकाचे नावे रक्षित अरकोंडा आणि पद्मा अरकोंड रा.लोणवेली असून ते तेलंगणा राज्यातील आहेत. नदी पात्रात शोधाशोध केली असता नदीपात्रात मुलासह आईचे शव मिळाले.
महाशिवरात्रीला देवदर्शनासाठी गेलेल्या माय-लेकाचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याने अरकोंडा कुटूंबा वर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळ हळ व्यक्त केली जात आहे.