डॉ बाबासाहेब आंबेडकरानी जगातील सर्वात मोठी राज्यघटना भारत देशाला दिली-समतादूत प्रज्ञा राजुरवाडे
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे घटना परिषदेच्या मसूदा समितीचे अद्यक्ष होते 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची राज्यघटना लिहुन पुर्ण केली बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय परिश्रमाने ही राज्यघटना लिहली
ही राज्यघटना लिहित असताना तथागत बुधाना समोर ठेवुन समता स्वंतत्र,बंधुता ,न्याय प्रज्ञा शिल,करुना मैत्रीचे बिजे भारतिय राज्यघटनेत रुजविली व लोकशाही विचारप्रणाली नुसार या देशातिल पक्ष,प्रशासन व्यवस्था,कायदे यंत्रणा निरनीराळ्या योजना व राज्य केंद्र शासनाची कर्तव्य,वेगवेगळ्या आयोगाची कर्तव्य रास्ट्रपति,पंतप्रधान,मुख्यमंत्री,सांसद,लोकसभा,राज्यसभा यात निवडुन येनारे लोकांच्या भूमिका आनी कार्य कर्तुत्व काय आहेत यांचे सपूर्ण नियोजन भारतिय सविधानात बाबासाहेब यांनी नमुद केले आहे ते योग्य प्रकारे जनतेसाठी राबवावी हे भारतिय सविधानाचे उदीष्ठ आहे नवभारताची निर्मिती करताना मी प्रथम भारतिय व शेवटीही भारतिय असा महाण संदेश डॉ बाबासाहेब आंबेडकरानी देवून जगातील सर्वात मोठी आदर्श अशी राज्यघटना भारत देशाला दिली असे प्रतीपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर सशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी च्या समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी सविधान सन्मान दिन कार्यक्रम निमित्त ग्रामपंचायत नेरी येथे भारतिय सविधानावर आपल्या प्रमुख मार्गदर्शनात बोलत होत्या
या कार्यक्रमाच्या अद्यक्ष प्रा.विशाखा कऱ्हाडे होत्या तर प्रमुख अतिथी नेरी ग्रामपंचायत उपसरपंच कामडी,ग्रा.सदस्य नागदेवते,जनबंधू ,नदीनी राऊत,कडूकार वकील संदीप हिंगे आदी उपस्थित होते पुढे बोलताना समतादूत प्रज्ञा राजुरवाडे म्हणाल्या की सविधान हा भारताचा राष्ट्रीय ग्रंथआहे देशाचे अखंडतव सविधानामुळे टिकून आहे मुलभुत हक्क ज्याप्रमाने आपणास माहित आहे त्याचप्रमाने प्रतेक नागरीकानी राष्ट्रीय प्रतिकाचा मान राखणे सवीधानाने घालुन दिलेल्या नीयमाचे पालन करने देशाचे सार्वभोम्त्व राखणे,सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणे हे मुलभुत कर्तव्य सवीधानात दिली आहेत याची जानीव असने फार गरजचे आहे भारताचे सविधान केवळ नागरीकाना सूरक्षित करते असे नाही तर भारताच्या वन्य जिवाची तसेच वनक्षेत्राची सुधा जबाबदारी राज्यावर सोपविते ज्या शाशव्त विकास संकल्पनेची चर्चा आज जगात होत आहे जागतिक स्तरावरील निर्देश भारतिय सविधानात 42 घटनादुरस्तीनुसार समाविस्ठ करण्यात आले आहे सविधानात पर्यावरनाचा समावेश आहे घटनेच्या 48 अ मंन्धे आहे सविधान हे सर्वाचे स्वास आहे मग सविधान रक्षनाची जबाबदारी ही सर्वाची आहे इथल्या प्रतेक काळजात बाबासाहेबाचे सविधान असले पाहिजे इथल्या मातीमधे सविधान हे रुजले पाहिजे मी सविधान बोलतो असे सर्वाना वाटायला हवे प्रतेकाच्या न्यायाचा चेहरा सविधान आहे बाबासाहेब हे राष्ट्रप्रेमी होते जगाला शांततामय व कल्यानकारी बनविण्याची ताकत उर्जा मार्गदर्शन फक्त भारताच्या सविधानात आहे म्हनुन इथल्या प्रस्थापित सरकारने घरोघरी प्रतेक मंदीरात सुधा सविधान ग्रंथ पोहचवा व त्याचे वाचन व्हावे ही सकल्पना राबवावी फक्त सविधानावर देश चालतो येवढेच माहीत आहे आपणास पन सविधानातिल आशयविषयी समजून घेणे गरजेचे आहे डाँ बाबासाहेब आंबेडकर हे ऐक ऐक कलम लीहित होते 298 सदस्य त्यावर प्रश्न विचारत होते पन डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे येथील स्त्री पुरुष सर्वाना समानतेच्या पातळीवर सविधान योग्य कसे आहे हे सांगत होते म्हनुन भारताचे सविधान मजबूत आहे असे स्वीस्तर मार्गदर्शन समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी केले यावेळी प्रास्तावीकाचे वाचन करण्यात आले या कार्यक्रमाचे संचालन विलास राऊत यांनी केले तर आभार ग्रा.सदस्य संगीता कामडी यांनी मानले