ताज्या घडामोडी
महेंद्र मस्के यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार
प्रतिनिधी: हेमंत बोरकर
चिमुर तालुक्यातील सावरी(बीड.)येथील ग्रामसेवक महेंद्र मस्के यांना पंचायत राज दिनी आदर्श ग्राम सेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.त्यांच्या या कार्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गट ग्राम पंचायत सावरी(बीड.)येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक महेंद्र मस्के याना मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर यांचे हस्ते पंचायत राज दिनाला आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला.प्रशासकीय कामात निस्वार्थ अस काम ते करीत असतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार मिळाला,त्या बद्दल त्यांचं सर्व स्तरातुन कौतुक व अभिनंदन सुरू आहे.पुरस्कार मिळाला या बद्दल महाराष्ट्र दिन व कामगार दिनी सावरी(बीड.)चे उपसपंच निखील डोईजड यांनी महेंद्र मस्के यांचा सत्कार केला.