ताज्या घडामोडी
मतमोजणीच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक यांनी भेट देऊन केली पाहणी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
98 पाथरी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी 23 ( शनिवार ) रोजी सकाळी 8 वाजेपासून शासकीय औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था विटा रोड पाथरी येथे सुरू होणार आहे. श्री रवींद्र सिंग परदेशी पोलीस अधीक्षक परभणी यांनी शासकीय औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था मतमोजणीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था पाहणी करून उपस्थित सर्व पोलीस अधिकाऱ्यांना व पोलीस कर्मचाऱ्यांना सुरक्षा व्यवस्था संबंधी मार्गदर्शन केले यावेळी त्यांच्यासोबत डॉ समाधान पाटील पोलीस उपाध्यक्ष, श्री मंडलवार पोलीस निरीक्षक पाथरी ,श्री माकोडे पोलीस निरीक्षक पाथरी ,श्री बोरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री सांगळे साहेब पोलीस निरीक्षक उपस्थित होते.