ताज्या घडामोडी

आमदार धर्मरावबाबा ठरले मंथनवार कुटुंबीयासाठी देवदुत

आर्थिक मदत करित घर बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करुन देण्याचे दिले आश्वासन.

तालुका प्रतिनिधी:विस्तारी गंगाधरीवार अहेरी

अहेरी येथील नगरपंचायत प्रशासनाकडून नुकतीच अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे.आझाद चौक ते दानशुर चौक या रोडवरील अतिक्रमण काढण्याचे काम सद्या सुरू करण्यात आले आहे.प्रभाग क्रमांक अकरा येथील आझाद चौकात मंथनवार कुटुंबाचे घर आहे.मागील पन्नास वर्षांपासून हे कुटुंब येथे वास्तव्यास आहे.परंतु त्यांचे हे घर अतिक्रमणात येत असल्याने नगरपंचायत प्रशासनाने या घरावर जेसीबी चालवून जमीन दोस्त केले.त्यामुळेच मंथनवार परिवार बेघर होऊन रस्त्यावर आला.त्यांना अहेरीत स्वतःच्या मालकीची कुठेही जमीन नाही.यांची परिस्थिती जेमतेम आहे. ” हातावर आणुन पानावर खाने “. अशा गरिब परिस्थितीत ते बेघर झालेत लहान मुलाबाळांसह ते रस्त्यावर आलेत.अतिक्रमणात त्यांचे घर पाडल्याने त्यांचेवर दुखाचा डोंगरच कोसळला.
अतिक्रमणात घर पाडल्याने मंथनवार कुटुंब हे बेघर होउन रस्त्यावर आले आहे.ही बाब आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना माहित होताच त्यांनी मंथनवार कुटुंबातील सर्व सदस्यांना राजवाड्यावर बोलवून त्यांचेशी मोठ्या आत्मीयतेनी चर्चा केली व त्यांना धीर दिला.आमदार धर्मराव बाबानी या कुटुंबातील लोकांना आर्थिक मदत करुन घर बांधण्यासाठी यथाशिघ्र जमीन उपलब्ध करुन देण्यासाठी आपण स्वत:ह प्रयत्नशिल राहु असे मंथनवार कुटुंबीयांना आश्वस्त केले.पुढे आपल्या कुटुंबाला पक्के घर बांधून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आमदार धर्मरावबाबा यांनी मंथनवार कुटुंबाला आश्वस्त केले.
गरिब लोकांनी खचून न जाता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत खंबीर राहत खचून न जाता उभे राहावे. “जीवन जगतांना अनेक संकटे हे येतच असतात. संघर्ष करीत जीवन कसे जगायचे हे स्वत: आपल्याच ठरवावे लागते.गरिब व गरजू लोकांसाठी आपण नेहमीच मदत केली आहे पुढे सुध्दा गरिब व गरजू लोकांनी कोणतीही मदत हवी असल्यास निसंकोचपणे माझेकडे येत आपल्या समश्या सांगाव्यात.मी स्वत: व शासनाकडुन मदत मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशील राहील.आदिवासी लोकांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत.या योजनाची माहिती घेऊन त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.यावेळी राकाँ.अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार,सामाजिक कार्यकर्त अमोल मुक्कावार, मकमुर शेख,मंथनवार परिवारातील राकेश मंथनवार,अशोक मंथनवार,नरेश मंथनवार हे आपल्या परिवारासह उपस्थित होते.आमदार धर्मराव बाबानी आपल्याला ऐनवेळी मदत केल्याबद्दल त्यांनी बाबाचे आभार व्यक्त केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close