ताज्या घडामोडी

राज्यस्तरीय अबॅकस आणि अर्थ मॅटीक सिस्टम स्पर्धेमध्ये चिमुर च्या चार मुलांनी मारली बाजी

नेरी ( प्रतिनिधी )

राज्यस्तरीय ऑनलाईन युसिमास अबॅकस स्पर्धेमध्ये चिमुर मधील मुलांनी कॅल्कुलेटर चा उपयोग न करता १० मिनीटामध्ये २०० प्रश्नांचे उत्तर देऊन ट्राफी पटकवली विदर्भा मध्ये आयोजीत आठवी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजीत केली होती त्या मध्ये चिमुर येथील मुलांनी रनर अप आणि मेरीट ट्राफी अवार्ड जिंकले .
युनिवर्सल कंसेप्ट ऑफ मेंटल अर्थ मॅटीक सिस्टम ( युसिमास ) द्वारा ५ते १५ वर्ष मुलांची राज्यस्तरीय स्पर्धा आयोजीत केली गेली होती या स्पर्धेमध्ये चिमुर च्या १३ मुलांनी भाग घेतला होता . यामध्ये ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातुन ५ते १५ वर्षाच्या मुलांनी गणित या विषयात आपले कैशल्य दाखविले.
यामध्ये चिमुर मधील विद्यार्थी मंदार लाखे , अनर्व सोनवाणे , सुहानी लांडगे यांनी रनर अप मध्ये आपले स्थान सुनिच्छीत केले तर साई चौधरी ने मेरीट लिस्ट मध्ये आपला स्थान निस्चीत केला . मुलांच्या सफलतेवर चिमुर अबॅकस सेंटर चे संचालक लोकेश बंडे म्हणाले जे विद्यार्थी कठीण परिश्रम घ्यायला घाबरत नाही ते आपल्या जिवनामध्ये अवश्य सफलता प्राप्त करतात .
कोरोना महामारी च्या दुसऱ्या लाटेमध्ये मुलांच्या या सफलते मुळे पालक , अबॅकस सेंटर व चिमुर शहर साठी ही गौरवाची बाब झाली आहे.
चिमुर शहरातील मुलांनी उत्कृष्ट प्रदर्शन केल्या मुळे सेंटरचे संचालक लोकेश बंडे व चिमुर शहर वासीयांनी मुलांचे अभिनंदन केले व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभकामना दिल्या .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close