ताज्या घडामोडी

अपंग विधवा निराधार लोकांना दरमहा मानधन १५ दिवसांत वितरित करा

अन्यथा प्रहारचे तहसिल कार्यालयावर हल्ला बोल आंदोलन करण्याचा इशारा

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर

दिव्यांग विधवा तसेच निराधार वृद्ध लोकांना उपजीविकेसाठी व जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या प्रवर्गातील अपंग विधवा वृद्ध निराधार लोकांना दरमहा मानधन देण्यात येते व त्या मानधन चा उपयोग निराधार लोक उपजीविका तसेच औषधोपचारावर खर्च करतात पण कोरोनाच्या उद्भवलेल्या परिस्थिती मुळे हे मानधन शासनाकडून नियमितपणे मिळत नसल्यामुळे निराधार लोकांना उपजीविकेसाठी खूप अडचणी चा सामना करावा लागत आहे.

त्यामुळे निराधार लोकांना नियमितपणे मानधन मिळण्यासाठी वेळोवेळी प्रहारचे विनोद उमरे यांच्यावतीने चिमूर तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन येत्या १५दिवसात मानधन जमा न झाल्यास तहसिल कार्यालया वर हल्ला बोल आंदोलन करण्याचा इशारा दिला मा. तहसीलदार साहेब यांनी प्रहार सेवक विनोद उमरे यांना येत्या १५ दिवसात आतापर्यंत चे निराधार यांचे मानधन त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा होईल असल्याची माहिती मा. तहसिदार तुळसिदास कोवे साहेब व त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली त्यावेळी निवेदन सादर करतानी चिमूर तालुक्यातील अपंग विधवा वृद्ध निराधार लाभार्थी उपस्थित होते व‌ प्रहार जनशक्ती पक्षचे प्रहार सेवक प्रहार सेवक विनोद उमरे,रमेश वाकडे, मुरलीधर रामटेके, आदीत्य कडू संकेत क्षिरसागर , लोकेश खामनकर,संदीप निखाडे, सत्यपाल गजभे, नारायण निखाडे,सचिन घानोडे, आदी उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close