परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये कोणतीही सुविधा न देणाऱ्या केंद्रप्रमुख व शाळेवर कार्यवाही करा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परभणी मध्ये टायपिंगच्या परीक्षा ममता कॉलनी येथील भारतीय बाल विद्या मंदिर या सेंटरवर सुरू झालेले आहेत परंतु भारतीय बाल विद्यामंदिर या शाळेने व केंद्रप्रमुख परदेशी साहेब यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही सोयी सुविधा परीक्षेसाठी दिलेले नाहीत सर्व विद्यार्थ्यांना बाहेर बसून त्यांच्या परीक्षा घेण्यात येत आहेत याबाबत संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष नितीन देशमुख व जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांना याबद्दल जाब विचारला तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी सलगरकर यांना सुद्धा या संदर्भात जाब विचारून विद्यार्थ्यांना हॉल उपलब्ध करून का देण्यात आले नाही .
विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून न दिल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क वापस देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच काही इन्स्टिट्यूट यांच्या मशीन सुधा गायब झाल्या आहेत त्याची सुधा चौकशी करून संबंधित शाळा मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांच्यावर कार्य वाही करण्यात यावी अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असे प्रतिनिधीशी बोलतांना म्हणाले .