ताज्या घडामोडी

विद्यमान अधिकाऱ्यांच्या काळात गौन खनिज तस्करांचा सुवर्ण काळ

खुले-आम गौन खनिजाची रात्रं-दीवस चोरी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की आणखी काय?

पाथरी तालुक्यातील कोट्यावधींचा महसुल कोणाच्या घशात!

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मो .7218275486.

पाथरी तालुक्यात रात्रीच्या वेळी गोदावरी पत्रातुन वाळु,माती व जायकवाडीच्या डाव्या कालवा लगत असलेल्या मुरुमाची पावसाळा संपताच मागिल एक महीण्यापासुन खुलेआम वाळु उपसा व मातीचे उत्खनन व वाहतूक त्याच बरोबर जायकवाडीच्या डाव्या कालव्या लगतच्या मुरुमाचे उत्खनन व वाहतूक रात्रदीवस प्रशासनाच्या नाकावर टीच्चुन सुरु असताना पहावयास मिळत आहे.
तालुक्यातील विविध ठीकणावरुन गोदावरी पत्रातुन वाळु,माती व जायकवाडीच्या डाव्या कालव्या लगतच्या मुरुमाचे अवैध उत्खनन व वाहतूक सुरु असल्याने कोट्यावधी रुपयांचा महसुल बुडत असुन वाळु, माती व मुरुमाचे उपसा करणारे लखोपती होवु लागले आहे.
दरम्यान हा अवैध वाळु,माती,मुरुम उत्खनन व वाहतुक करण्यासाठी कोन मुभा या लोकांना देतोयं,शिवाय अवैध आलेला लाखो रूपयांचा महसूल कोणाच्या घशात जातोय.याची चर्चा मात्र आत्ता जोर धरु लागली आहे.कारवाईच्या नावाखाली थातुर-मातुर कारवाई करत मोठा डंका वाजवताना मागिल काही दीवसात पहावयास मिळाले.पाथरी तालुक्यातील नाथ्रा,डाकुपिंप्री,मसला ढालेगाव येथुन वाळू,मातीचा उपसा उत्खनन व वाहतूक होताना दीसुन येत आहे.त्याच बरोबर जायकवाडीच्या डाव्या कालव्या लगत असलेल्या देवनांन्द्रा,पोहेटाकळी शिवारातुन रात्रदीवस चोरी होताना पहावयस मिळते.खुले-आम वाळु,माती व मुरुमाची खुलेआम उपसा सुरु आहे.या गावातुन शासनाच्या कोट्यावधी रुपयांचा महसुल बुडवत वाळु,माती,मुरुम माफीया महसुल व पोलीसांच्या नाकावर टीच्चुन सध्या अवैध वाळु, माती व मुरुम उत्खनन व वाहतूक करण्यात येते.पावसाळा संपताच वरील गावांच्या गोदावरी नदी पात्रातुन माती व वाळुचा उपसा सुरु असुन त्याच बरोबर जायकवाडीच्या डाव्या कालव्या लगत असलेल्या मुरुमाचे उत्खनन व वाहतूक करण्यासाठी जनु मुरुम,माती,वाळु माफीयांची शर्यत लागली आहे असं दीसतय.दीवस रात्र खुलेआम पोकलेन,हायला,क्रेन,बोट, जेसीबी,ट्रक, ट्रॅक्टर आदी साहीत्याच्या सहाय्याने करण्यात येते.
महसुल प्रशासनाने मागिल काही दीवसाखाली छोट्या मोठ्या थातुर-मातुर कारवाई करत डंका पिटला होता.मात्र या वाळु,माती,मुरुम उपसा व उत्खनन व वाहतुकीतुन कोट्यावधींचा अवैध महसुल जातोय कोणच्या घशात! याची चर्चा नदी काठावरील गावात व पाथरी शहरात चविने होताना दीसत आहे.दुसरीकडे अवैध वाळु,माती व मुरुम उपसा उत्खनन व वाहतूक करणारे माफीया कोट्याधिस होवुन प्रशासनावर पैशाच्या जोरावर, बळावर आपला रुबाब दाखवत हा उपसा उत्खनन व वाहतूक खुलेऊ करु लागले आहे.दरम्यान पाथरी तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातुन होणारी माती,वाळु उपशाने नदी पात्राची मोठी वाट लागली आहे.त्याच बरोबर जायकवाडीच्या डाव्या कालव्या लगतचा पोहे टाकळी,देवनांन्द्रा शीवारातुन मोठ्या प्रमाणावर मुरुमाचे उत्खनन व वाहतूक करण्यात येत असल्यामुळे कालव्याची मोठी हाणी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.याकडे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी वेळीच लक्ष देण्याची गरज असुन पाथरी तालुक्यातुन होणाऱ्या माती,मुरुम,वाळुचे होणारे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांना व पाथरीतील अधिकाऱ्यांंचा योग्य तो बंदोबस्त करुन कारवाई करण्याची गरज आहे .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close