अखेर गोंडपीपरी येथील आठवडी बाजार सुरू
नागरिकांत आनंदाचे वातावरण
ग्रामीण प्रतिनिधी:महेश शेंडे विठ्ठलवाडा
गोंडपीपरी : शहरात दर रवीवारला भरणारा आठवडी बाजार कोरोणा संसर्गामुळे मागील सात ते आठ महिन्यापासून बंद करण्यात आला होता.त्यामुळे भाजीपाला दुकानदार,शेतकरी,कपडे व्यापारी,मनेरीचे दुकान विक्रेत्यावर उपासमारीची वेळ आली होती. गोंडपीपरी शहरातील रवीवारला भरणारा आठवडी बाजार सुरू करण्यात यावा ह्या संदर्भात निवेदन देण्यात आले.
तरी सुद्धा गोंडपीपरी येथील आठवडी बाजार सुरू करण्यास विलंब झाला. त्यामुळे
सर्व सामान्य नागरिकांसह ग्राहक – भाजीपाला विक्रेत्याना मोठी अडचण निर्माण झाली.चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेश पारित करताच आज दि.3 ऑक्टोबर रोज रवीवारला गोंडपीपरी शहरातील बाजार भरण्यास सुरवात झाली असल्याने बाजारात प्रचंड गर्दी दिसुन आली. लहान -मोठे व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते दुकान टाकून बसल्याचे दिसुन आले.
आठवडी बाजार भरण्यास आज पासून सुरवात झाली असल्याने लहान -मोठे व्यावसायिक , भाजीपाला विक्रेते, शेतकऱ्यसह ग्राहका कडून आनंद व्यक्त केला जात आहे.