आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत चिमूर येथील निवासस्थानी महिला बचत गट मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न
महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील – आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया
प्रतिनिधीः हेमंत बोरकर
दि. ६ ऑगस्ट/ आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत चिमूर येथील निवासस्थानी महिला बचत गट मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न झाला. भाजपा महिला आघाडी तालुका चिमूर च्या वतीने महिला बचत गट मार्गदर्शन मेळाव्याचे आज आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सर्वप्रथम आमदार बंटीभाऊंनी उपस्थित मान्यवरांसह क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजन करून विनम्र अभिवादन केले. दरम्यान, भाजपा महिला आघाडी व विविध बचत गटांच्या वतीने आमदार बंटीभाऊंचे व मंचावरील सर्व मान्यवरांचे उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ भेट देऊन उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
महिला बचत गटाच्या माध्यमातून गावांचा, तालुक्याचा विकास करावा. अनेक महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, आमदार बंटीभाऊंनी उपस्थित माता-भगिनींशी लघु उद्योग, गृह उद्योग व त्यासंदर्भात अनेक मुद्यांवर संवाद साधला. महिला उद्योजकांसाठी महाराष्ट्र राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली व तालुक्यातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून नवनवीन उद्योगधंदे उभारण्यासाठी प्रयत्न करावा त्याकरिता लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता आणि सहकार्य करणारच अशी ग्वाही दिली.
तालुक्यातील विविध महिला बचत गटाच्या वतीने सादर करण्यात आलेले निवेदने स्वीकारून सर्वांना आश्वस्त केले. महिला सक्षमीकरणासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला तालुक्यातील असंख्य माता-भगिनींनी उपस्थिती दर्शवित उत्तम प्रतिसाद दिला.
यावेळी मंचावर प्रामुख्याने भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजूकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा मायाताई नन्नावरे, भाजपा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा गीताताई लिंगायत, भाजपा महिला आघाडी जिल्हा सचिव तथा तालुका महामंत्री भारतीताई गोडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.