शिवसेना चिमूर विधानसभा समन्वयकपदी भाऊराव ठोम्बरे यांची नियुक्ति

तालुका पदाधिकार्यानच्या नियुक्तया जाहिर
मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
दिनांक 11 आगस्ट 2021 रोजी झालेल्या आढावा बैठकीत वरोरा, ब्रम्हपुरी, चिमूर विधानसभा क्षेत्राच्या शिवसेना पदाधिकारी नियुक्तया संपर्क प्रमुख प्रशांत कदम यानी नुक्त्याच नियुक्तया जाहिर केल्या असून भाऊराव ठोम्बरे यांची चिमूर विधानसभा समन्वयक पदी नियुक्ति करण्यात आली असून चिमूर तालुका पदाधिकारी सुधा जाहिर करण्यात आले,
हिंदुव्ह्र्दयसम्राट शिवसेना प्रमुख मा, बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख मा, उद्धवजी ठाकरे यांचे आदेशानुसार व शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर यांच्या सूचनेनुसार वरोरा-भद्रावती, चिमूर, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक घेऊन समोरिल निवडणुका लक्ष्यात घेता चंद्रपुर जिल्ह्या सम्पर्क प्रमुख प्रशांत कदम यानी शिवसेना जिल्ह्या प्रमुख नितिन मत्ते यांचे उपस्थित चिमूर विधानसभा समन्वयक पदी भाऊराव ठोम्बरे यांची नियुक्ति केली, त्याच बरोबर चिमूर तालुक्यात पक्ष मजबूत कर्णयकरिता प्रभारी तालुका प्रमुख बालुभाऊ सातपुते चिमूर यांची तालुका प्रमुखपदी नियुक्ती केली, चिमूर शहर प्रमुख पदी सचिन खाड़े, निवासी उपतालुका प्रमुखपदी सुधाकर निवटे यांची तसेच सर्व जिल्हा परिषद सर्कल उपतालुका प्रमुखपदी शंकरपुर जि, प, सुरेश गजभिये , भिसी जि, प, विनायक मुंगले, मांसळ जि, प, नत्थुजी खाटे, नेरी जि, प, उपतालुका प्रमुख पदी किशोर उकुंडे यांची नियुक्ति करण्यात आली, आम्बोली पंचायत समिति विभाग प्रमुखपदी राजेन्द्र जाधव, नेरी पंचायत समिति विभाग प्रमुख पदी सुधीर नांनावरे, चिमूर तालुका संघटकपदी रोशन जुमड़े, प्रसिद्धि प्रमुख पदी आशीष बागुलकर नेरी शहर प्रमुख पदी पिसे, चिमूर उपशहर प्रमुख पदी सुभास ननावरे, देवेंद्र गोठे यांची नियुक्ति जाहिर करण्यात आली,