ताज्या घडामोडी
कृष्णा कॉलनी कडे जाणारा रोड छोटा आणि नाली मोठी

तालुका प्रतिनिधी:सनम रा. टेंभुर्णे
ब्रम्हपुरी येथील गडचिरोली रोड वरील उज्वल रेस्टॉरंट च्या बाजूने कृष्णा कॉलनी कडे जाणारा रस्त्या ला लागून असलेली तुडुंब भरलेली नाली ही रोड पेक्षा मोठी झाली असून तिथे वाहतुकीला नागरिकांना खूप त्रास होत आहे. हायवेला जाण्यासाठी कृष्णा कॉलनी आणि शिक्षक कॉलनी मधील नागरिकांना तोच एक रोड आहे. म्हणून तेथील नागरिकांना वर्षापासून त्रास सहन करावा लागत आहे.त्या ठिकाणी मोठा अपघात घडण्याची देखील शक्यता आहे, या कडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.