राष्ट्रवादी महिला आघाडी चिमुरची आगेकूच

चिमूर तालुक्यातील प्रत्येक गावात महिला संघटन मजबूत करण्याचा केला निर्धार
ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
चिमुर तालुका अध्यक्ष प्नियंका कुष्णा बहादुरे यांच्या नेतृत्वात तसेच जिल्हाध्यक्ष बेबीताई विके यांच्या मार्गदर्शनाखाली गाव तेथे राष्ट्रवादी उपक्रम सुरू केले आहे. गाव पातळीवर संघटना मजबुतीसाठी प्रत्येक गावात आणि खेड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पोचवण्याचे काम अतिशय जोमात असून या अंतर्गत मौजा खंडाळा येथील संगिता गजभिये यांच्या घरी सभा घेऊन महिला ना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष मा, शरदचंद्र पवार साहेब यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यात येत आहे. त्यात महिलांना येणाऱ्या अनेक अडचणी, समस्या यावर आणि अनेक विषयावर चर्चा करण्यात आली .या सभेला उपस्थित क्रिष्णा बहादुरे ,हंसराज रामटेके, अमित कराडे, दीपा कराडे, रामाजी नन्नावरे उपस्थित होते या कार्यक्रमात अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. प्नियंका कुष्णा बहादुरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला तालुकाध्यक्ष चिमुर यांच्या नेतृत्वाखाली व कार्य प्रणाली वर विश्वास ठेवीत १४ महिला नी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घडयाळ हाताला बांधली या मध्ये रज्जूताई रामाजी नन्नावरे,मंगलाताई विकास भोयर,ललिता यादव चौथे,आशाताई विठ्ठलजी नन्नावरे,रूकमा विठ्ठलजी घरत,अस्मिता गणेश घरत,सुर्वाताताई सुनिल रणदीवे,शांता मनोहर मेश्राम,मिराताई खटूजी वाघा,साईत्रा डोन्टजी वाघा,पार्वता अंबादास जिवतोडे,श्रीदेवी विश्वास भोयर,संगिता नथ्थुजी गजभिये, कांता पाडूरग ढोले या सर्व महिलांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये किष्णा बहादुरे, हंसराज रामटेके,अमित कराडे,दिपा कराडे यांनी राष्ट्रवादी पक्षाचा दुपट्टा टाकून हार्दिक स्वागत केले.