नागभीड ब्रम्हपुरी महामार्गावरील भिकेश्वर येथे फिरायला निघालेल्या आजी व पळनातनीला ट्रकने चिरडले

तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड
नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत ब्रम्हपुरी महामार्गावरील भिकेश्वर येथे फिरायला निघालेल्या आजी व पळनातनीला ट्रकने चिरडले. यात आजीचा जागीच मृत्यू झाला तर पळनातनीचा उपचारादरम्यान म्रुत्यू झाला . अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला .
नागपूर वरून निघालेल्या आयशर ट्रक एम्. एच. ३३टी २४७० हा भाजीपाला घेऊन नागभीड वरुन ब्रम्हपुरी कडे जात असताना चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवुन भिकेश्वर मार्गावर फिरायला गेलेल्या सुगंधा विश्वनाथ अनवले (६०) रा. भिकेश्वर व पळनातीन हार्दीका अमन मिसार (६) रा. सुलेझरी हार्दिका ही शाळा नसल्याने रविवारीच आजीकडे पाहूणी म्हणून आली होती, आणि सोमवारी तिच्यावर काळाने घात घातला. तीच्या या अकाळी म्रुत्यूनंतर हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान, या घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली.
पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन चालक विरोधात कलम २७९,३०४ (अ) भादंवि सहकलम १८४,१३४/१७७ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संधी साधून वाहन चालक पळून गेला, ठाणेदार प्रमोद गेडाम यांच्या नेतृत्वाखाली अधिक तपास सुरू आहे.