ताज्या घडामोडी

पिण्याच्या पाण्यासाठी नगरपरिषद समोर प्रहार जनशक्ती पक्ष चे आमरण उपोषण

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

शहरातील महेबुब नगर मधिल रस्ते नात्या पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकुन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही अनेक वेळा निवेदन दिले आंदोलन उपोषण करुण सुद्धा मुख्याधिकारी यांनी दखल घेतली नसून वरीष्ठ अधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली केली आहे. तसेच जाणून बुजुन मुस्लिम भाग असल्याने दुर्लक्ष केले आहे तसेच विभागीय आयुक्त साहेब, जिल्हाधिकारी साहेब यांच्या पत्रची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. उन्हाळ्याचे दिवस रमजानचा महिना चालू असून दोन किलोमीटर अंतरावरून सिंदफणा नदीपासून पिण्याच्या पाण्याची सोय येथील नागरिक करीत आहे. माजलगाव शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनेक कुटुंबांनी घरकुल बांधण्यासाठी अर्ज दाखल केले होते व ते मंजूर करून लाभाथ्र्यांनी घरी सर्व बांधले असून अद्यापही संपूर्ण हप्ते लाभाथ्र्यांना वाटप करण्यात आले नाही हे हप्ते तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे या प्रकरणी अनेक तक्रारी निवेदन देऊन कोणत्याही
प्रकारचा दखल घतला नाही म्हणून नगरपारषद मुख्याधिकारी यांच्या वर दप्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत शिस्तभंगाची कार्यवाही करावीमहेबुब नगर मधील पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन तात्काळ टाकावी. प्रधानमंत्री घरकुल योजना के लाभार्थी यांचे 2019 मधिल राहिलेल्या घरकुलाचे हफ्ते तात्काळ वाटप करावे मा. साहेबांनी तात्काळ दखल घेऊन पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन ची व्यवस्था करुण माजलगाव नगरपरिषद मुख्य अधिकारी यांचा वर शिस्त भंगाची दप्तर दिरंगाईची कार्यवाही करण्यात यावी म्हणून नगरपरिषद समोर अमरण उपोषणास महेबूब नगर मधील रहिवाशी बसले आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close