ताज्या घडामोडी

चंदन शेती म्हणजे शेतकऱ्यासाठी सोन्याची खान – डॉ महेंद्र घागरे

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे

घनश्यामजी पिसे कृषी संशोधन केंद्रातर्फे नेरी व नागभीड येथे ‘रक्तचंदनाची शेती’ या विषयावर शेतकरी मेळावा व रक्तचंदनाचे बीज वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे होते याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ महेंद्र घागरे यांनी चंदन शेती म्हणजे शेतकऱ्यासाठी सोन्याची खान आहे व जागरूक शेतकरी, युवक युवतींनी चंदन शेतीला आत्मसाद करण्याची हीच योग्य वेळ आहे असे मार्गदर्शन केले.
विदर्भातील शेतकरी समृद्ध होऊन त्याची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने प्रेरित होऊन चिमूर तालुक्यातील सातारा येथे घनश्यामजी पिसे कृषी संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. याअंतर्गत अनेक विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन व मदत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी नेरी ग्राम पंचायत चे सरपंच सौ. रेखा नानाजी पिसे, श्री संजयजी डोंगरे, प्रा. राम राऊत सर, घनश्यामजी पिसे, प्रा. डॉ. अजय पिसे, माजी सरपंच रामदासजी सहारे, वसंत आष्टनकर, दादारावजी पिसे, डॉ सुनील पिसे व अनेक मान्यवर उपस्थित होते.
पारंपारिक शेतीतून पुरेसे आर्थिक उत्पादन होत नसल्यामुळे आज ग्रामीण भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे, त्याला शेतीत नवीन प्रयोग करण्याची गरज आहे त्याशिवाय शेतकऱ्याची आर्थिक समृद्धी शक्य नाही असे मार्गदर्शन प्रा. राम राउत सरांनी केले. नवनवीन प्रयोगातूनच शेतकऱ्याची आर्थिक प्रगती होऊ शकते, चंदन शेती हा एक चांगला पर्याय आपल्यासमोर आहे आणि आपण सर्वांनी आपल्या शेतीच्या बांधावर चंदनाचे झाडे लावावित व हीच योग्य वेळ आहे असे मार्गदर्शन श्री संजयजी डोंगरे यांनी केले.
घनश्यामजी पिसे कृषी संशोधन केंद्रातर्फे इच्छुक शेतकऱ्यासाठी मोफत रक्तचंदन लागवड माहिती व बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे, याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केंद्राचे मुख्य प्रवर्तक प्रा. डॉ. अजय पिसे यांनी केले.
याप्रसंगी हरित मित्र परिवाराचे अध्यक्ष डॉ. महेंद्र घागरे यांचा सत्कार सरपंच सौ. रेखाताई पिसे यांचे हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री विलास पिसे यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी घनश्यामजी पिसे कृषी संशोधन केंद्राचे कार्यकारी मंडळ सदस्य विशाल इन्दोरकर,आदित्य पिसे, माणिक पिसे, प्रमोद पिसे, शिगाल पाटील, भास्कर सोनवाने, प्रकाश वाघमारे, संजय मेश्राम, भीमराव कामडी, किशोर डहारे यांनी अथक मेहनत घेतली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close