बोथली तंटामुक्त समितीच्या वतीने प्रेमी युगल विवाहबद्द

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
चिमुर तालुक्यातील नेरी वरून जवळ असलेल्या बोथली येथील महात्मा गांधी गाव तंटामुक्त समितीच्या वतीने एका प्रेमी युगलांचे विवाह दिनांक 10/02/2022 ला हनुमान मंदिराच्या आवारात लावून देण्यात आले
बोथली येथील नवोदित प्रेम विर विवेक सहदेव चौधरी वय २8 वर्षे ,व नवोदित वधु काजल रमेश बारेकर मु पो बोथली वय 21 वर्ष या दोघांमध्ये मागील दोन वर्षपासून प्रेमसंबध निर्माण झाले होते दोघेही लपवून एकमेकांना भेटत होते त्यांच्या प्रेमाच्या चर्चा गावात रंगू लागल्या त्यामुळे त्यांनी लग्न करण्याचे ठरवून “साथ जियेगे साथ मरेंगे ” या म्हणी प्रमाणे या दोन्ही प्रेम वीरानी विवाह करण्याचे ठरविले आणि घरच्यांना न जुमानता लग्न करण्यासाठी मुलगी सरळ मुलाच्या घरी आली तेव्हा मुलाकडील मंडळींनी दोघांच्या समंतीने लग्न करण्यासाठी बोथली येथील तंटामुक्त समीतीकडे अर्ज सादर केला समीतीने अर्जाची रितसर तपासणी करून उपरोक्त जोडप्यांचा हिंदू रीतिरिवाजा नुसार लग्न लावून दिले
या विवाह प्रसंगी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सोपान मगरे सरपंच मनोहर चौधरी उपसरपंच रामू झोडे दीपक झोडे प्रताप नागपुरे रामकला श्रीरामे जगदीश पाटील अमीरखा पठाण संजय मेश्राम सहदेव चौधरी पौर्णिमा चौधरी नमिता पाटील श्रावण चौधरी अननाजी सहारे प्रमोद चौधरी विजय चौधरी पापा चौधरी तसेच समिती चे सर्व सदस्य गावकरी उपस्थित होते यावेळी नवोदित वरवधुंला शुभआशीर्वाद देण्यात आले.