ताज्या घडामोडी

मोहरम निमित्ताने जिल्ह्यात मद्यविक्री बंद

जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी

उत्सवाच्या काळात जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवून अनुचित प्रकार घडू नये याकरीता मोहरम निमित्ताने दि.20 ऑगस्ट 2021 रोजी मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी, परभणी यांनी प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील सर्व मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या सीएल-3 देशी दारु किरकोळ विक्री अनुज्ञप्ती, एफएल-2 सीएल, एफएल, टिओडी-3, देशी व विदेशी दारु किरकोळ विक्री अनुज्ञप्ती. एफएल-3 परवाना कक्ष व एफएल,बीआर-2, बिअरची सिल बंद बाटलीतून विक्री करण्यास बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्ती धारका विरुध्द कडक कारवाई करण्यात येईल. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close