ताज्या घडामोडी
चंद्रपूर जिल्ह्यातील डॉ. सुनिल जनबंधु यांना राष्ट्रिय कला गौरव पुरस्कार जाहीर
![](https://apnews.co.in/wp-content/uploads/2024/03/IMG-20240319-WA0004.jpg)
उपसंपादक:विशाल इन्दोरकर
चंद्रपूर जिल्ह्यातील एक छोटासा गाव नेरी ( चिमूर ) येथील डॉ. सुनिल जनबंधु हे नागपूर या महाराष्ट्राच्या उपराजधानीत राहून २०१९ पासून सतत सामाजिक कार्य करतांना दिसत आहेत. यांच्या या सामाजिक कार्याचा दखल घेऊन बुलडाणा फिल्म सोसायटीच्यावतीने दिला जाणारा राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे. बुलडाणा फिल्म सोसायटीच्यावतीने दरवर्षी कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचे वितरण ७ एप्रिल रोजी स्थानिक पत्रकार भवनात मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक होणार असल्याचे पुरस्कार निवड समिती प्रमुख सुरज वाडेकर यांनी पत्राद्वारे कळवले आहे.