घडोली येथिल विशेष श्रमसंस्कार शिबिराचे प्रा. दिपक गुंठेवार यांच्या हस्ते उद्घाटन
![](https://apnews.co.in/wp-content/uploads/2022/03/IMG-20220323-WA0107.jpg)
तालुका प्रतिनिधी:महेश शेंडे गोंडपिपरी
विद्याभारती शिक्षण मंडळ चंद्रपूर द्वारा संचालीत कला वाणिज्य महाविद्यालय गोंडपिपरीच्या वतीने स्वातंत्राचा अमृत महोत्सव वर्ष्यानिमित्त कोरोणा जनजागृती आणि युवाशक्ती या संकल्पनेवर आधारीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून दत्तक ग्राम घडोली येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन आज दि.23 मार्च रोज बुधवारला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घडोली येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन विद्याभारती शिक्षण मंडळाचे सचिव प्रा.दीपक गुंठेवार हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाषसिंह गौर, अध्यक्ष विद्याभरती शिक्षण मंडळ चंद्रपूर, उदघाटक प्रा.दिपक गुंट्टेवार सचिव विद्याभारती शिक्षण मंडळ चंद्रपूर, बबन भाऊ बांगडे कार्याध्यक्ष विद्याभारती शिक्षण मंडळ चंद्रपूर आणि मार्गदर्शक राजीवसिंह चंदेल यांच्या उपस्थितीत श्रम संस्कार शिबिराचे उदघाटन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हेमराज चौधरी सरपंच ग्रामपंचायत घडोली, संतोष झाडे तंटामुक्त समिती अध्यक्ष घडोली,ग्रा.प.सदस्य पौर्णिमा मेश्राम,गावचे पोलीस पाटील शकुंतला शेंडे यांची उपस्थिती होती.