ताज्या घडामोडी
कोविड19 लसीकरण जनजागृती कार्यक्रम
प्रतिनिधी :हेमंत बोरकर
दिनांक 26 नोव्हेंबर 2021 ला मौजा भिवकुंड
12.00 वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे covid-19 लसीकरण कार्यक्रम अंतर्गत ज्या महिलांनी अद्यापही एकही लस घेतली नाही अशा महिलांची मीटिंग बोलून त्यांना लसीकरण संदर्भात श्री. हेमचंद बोरकर (प्रभाग समन्वयक), तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती चिमूर यांनी लसीकरण संदर्भात जाणीव-जागृती पर मार्गदर्शन करण्यात आले
तसेच श्री. कैलास गेडाम पशु व्यवस्थापक (खडसंगी – मुरपार) यांनी गावातील एकही व्यक्ती लसीकरण न घेता राहू नये यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाला सरपंच सौ. चंदा पाटील, उपसरपंच श्री. गजानन कातवटे, पशुसखी प्रियंका खिरडकर, मत्स्य सखी नीलिमा गेडाम, कृषिसखी जिजा मेश्राम व गावातील महिला पुरुष उपस्थित होते.