निवडणूक आयोगाकडून सुविधा 2.0 ॲप अपडेट ॲपद्वारे उमेदवारांना मिळणार निवडणूक परवानग्या
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
भारत निवडणूक आयोगाने ‘सुविधा 2.0 ‘ हे मोबाईल ॲप अद्यावत केले आहे या ॲपद्वारे उमेदवार आणि राजकीय पक्षांना आता कोणत्याही ठिकाणाहून सहजपणे निवडणूक मोहिमेच्या परवानग्या ऑनलाइन सुविधावर द्वारे मिळणार पूर्वी फक्त ऑनलाईन पोर्टलवरच अर्ज सादर करता येत होते पण ॲपद्वारे सर्व प्रक्रिया मोबाईल वरून करता येणार आहे
असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे. या ॲपच्या खास वैशिष्ट्यांमध्ये उमेदवारांना अर्ज डाऊनलोड करणे प्रचारसंदर्भातील परवानग्या मागविणे ,अर्ज केलेल्या परवानगी संदर्भात सद्यस्थिती जाणून घेणे ,आणि मंजुरीची परत डाऊनलोड करणे ,आधी बाबी समाविष्ट आहेत .या ॲपमध्ये नामनिर्देशन प्रक्रिया, निवडणूक वेळापत्रक आणि निवडणूक आयोगाच्या ताज्या अद्यावत सूचना व आदेश देखील उपलब्ध असतील हे ॲप अँड्रॉइड साठी गुगल प्ले स्टोअरवर https://play.google.com/store/apps/details0id=suvidha.eci.gov.incandidateappli=1 या वर आणि आयओएस साठी प्ले स्टोअरवर https://apps.apple.com/app/suvidha-candidate/id6449583487 लिंकवर उपलब्ध आहे असे हे आयोगाने कळविले आहे या ॲपचा वापर पाथरी विधानसभा मतदार संघातील उमेदवार व पक्षाने करण्याचे आवाहन श्री शैलेश लाहोटी निवडणूक निर्णय अधिकारी पाथरी यांनी केले आहे.