ताज्या घडामोडी

वाघाळा परिक्षा केंद्रा वरील विज पुरवठा खंडीत;विज मंडळाची तानाशाही

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

सद्यस्थितीत विज महावितरण कंपनी कडून विजबील वसुली साठी चक्क गावेच्या गावे बंद करण्याची मोहिम राबवली जात आहे. वास्तविक पहाता ज्यांचा विजभरणा नाही अशांची विज तोडली जाते. मात्र पाथरीच्या विजवितरण उपअभियंत्यांनी चक्क गावातील विजगुल करून स्वत:ऑफिसात थंड हवा घेत बसण्यात धन्यता मानली असून परिक्षा केंद्रावरचा विज पुरवठाही खंडीत केल्याने विद्यार्थी आणि पालकां मधून संताप व्यक्त होत आहे.

मागिल दोन वर्षा पासून शाळा सतत बंद असल्याने ग्रामिण विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षणात मोठे नुकसान झाले आहे.या वर्षी कशाबश्या शाळा सुरू झाल्या त्यात परिक्षा ऑफलाईन असल्याने विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर जाऊन परिक्षा द्याव्या लागत आहेत.अशातच परिक्षा केंद्रावरील विज पुरवठा पाथरीच्या विजवितरण कंपनी कडून खंडीत करण्यात आल्याने ही निव्वळ तानाशाही असल्याची भावना विद्यार्थी आणि पालकां मधून व्यक्त होत आहे. वर्षभर तासिका झाल्या नाहीत विद्यार्थी दिवसरात्र एक करत परीक्षा काळात अभ्यास करत आहेत यातच विजवितरण कंपणी कडून संपुर्ण शेती आणि गावांची विज कट केली गेल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान विजवितरण चे अधिकारी जाणिवपुर्वक करत असल्याची भावना विद्यार्थी आणि पालकां मधून व्यक्त होत आहे. पररीक्षा केंद्रावर अखंडीत विजपुरवठा सुरू असला पाहीजे हा शासन नियम असतांना वाघाळा येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर मात्र विजेशिवाय परीक्षा घेतली जात आहे. कार्यालयीन कामकाज ऑनलाईन असल्याने बोर्डाशी संपर्क करणे अवघड होऊन बसले आहे. त्यातच उष्णतेत वाढ झाल्याने घामाच्या धारा पुसत विद्यार्थ्यांना परिक्षेचा पेपर द्यावा लागत आहे. या विषयी वाघाळा गावचे सरपंच बंटी पाटील यांनी ग्रामस्थांची ग्रामसभा घेत थकीत विजबिल भरण्याचे आवाहन ही केले या नंतर विज वितरणच्या अधिका-यांना काही दिवसांची सवलत मागितली गावात वसुली साठी येण्याचे आवाहन केले. मात्र विजवितरण चे अधिकारी मात्र याला प्रतिसाद देत नसल्याचे वाघाळा ग्रामस्थ सांगतात. विजवितरण च्या अधिका-यांनी किमान विद्यार्थ्यांचे नुकसान तरी टाळावे अशी मागणी शिक्षण प्रेमीं कडून होत आहे.


जिल्हा परिषद माध्यमिक शाळा वाघाळा या केंद्रांतर्गत नऊ उपकेंद्र आहेत. या सर्व केंद्रांवर एकूण ४०३ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. ज्यामध्ये वाघाळा जिल्हा परिषद केंद्रावर एकूण ५३ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.परीक्षेच्या ऐन वेळी विद्युत पुरवठा चालू नसल्याने विद्यार्थ्यांची अतिशय गैरसोय होत आहे. वाघाळा शाळेच्या मुख्याध्यापकांनी ११ मार्च रोजी विजवितरण कंपनीला लेखी पत्र देऊन वाघाळा शाळेचा विजपुरवठा अखंडीत सुरू ठेवण्या साठी लेखी पत्र ही दिले आहे. परीक्षेचे वेळापत्रक व तसेच विद्यार्थ्यांची संख्या वीज वितरण कंपनीला देऊन वीज पुरवठा या कालावधीमध्ये सुरू करण्याची विनंती प्रति वर्षी प्रमाणे याही वरषी केंद्र संचालक साळुंके यांनी केले आहे तरी सुद्धा विज सुरू राहत नसलयाने सर्व परीक्षा देणारे परीक्षार्थी त्रस्त झालेले आहेत.या विषयी गावचे सरपंच बंटी पाटील,अमोल वाघमारे आणि ग्रामस्थांनी पाथरीच्या तहसिलदारांना निवेदन देऊन वाघाळा गावासह परीक्षा केंद्रावरील विजपुरवठा सुरू ठेवावा अशी मागणी निवेदना व्दारे करून थकीत विजबिल वसुली साठी संपर्ण सहकार्य करणार असे सांगितले असतांना ही विजवितरण चे अधिकारी आपली तानाशाही सोडायला तयार नाहीत यात विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. १५ मार्च पासुन सुरू झालेल्या दहाविच्या शालांत परीक्षा ४ एप्रिल पर्यंत चालनार आहेत. या पुर्वी ही गावचे सरपंच बंटी पाटील यांनी गावातील नागरीकांना थकीत विजबील भरण्या साठी स्वत:गावभर फिरून जमा झालेली रक्कम महावितरण कडे भरणा केली आहे. या वेळी ही स्वत:सरपंच या साठी प्रयत्न करत असतांना महावितरण चे अधिकारी मात्र कार्यालयात पंखे,कुलर,एसीत बसुन विजबील वसुलीचे प्रयत्न करत असल्याने शिक्षण प्रेमी मधून संतापाच्या भावना व्यक्त होतांना दिसत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close