ताज्या घडामोडी

आष्टी-ईलुर परिसरात बिबट्याच्या हल्यात एक ठार

परिसरातील पाचवी घटना.

वनविभागाने बिबट्याच्या बंदोबस्त करिता लावलेले पिंजरे ठरलेे बेकामी.

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी- ईल्लूर परिसरातील जंगलात बिबट्याने हल्ला करून एका व्यक्तीस ठार केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.दि 30 सप्टेबर 2021 रोजी मृतक शंकर गंगाराम चिताडे वय 55 हा आखरा शेजारी जंगलात सरपणा करिता गेला असता नरभक्षी बिबट्याने त्याचेवर हल्ला चढवला व जंगल परिसरात ओढत नेऊन त्याचे लचके तोडून ठार केले.
जंगलात गेलेला शंकर घरी परत न आल्याने त्याच्या घरच्यांनी दुसरा दिवशी जंगलाच्या दिशेने शोध घेतला असता नरभक्षक बिबट्याने त्याचेवर हल्ला करून ठार केल्याचे दिसून आले. त्याचे शिर धडावेगळे ,एक हात तोडलेले दिसून आले.ही या परीसरातील पाचवी घटना असून दोघांचा मृत्यू तर तिन जखमी झाले आहेत.वनविभागाने पेपरमील वसाहतीत बिबट्याला पकडण्याकरिता तिन पिंजरे लावले होते. मात्र त्या पिंजरांना बिबट्या हुसकावनी देत जंगलात दिशेने गेल्याचे दिसून येत आहेत.या पुर्वी वनविभागाने परिसरातील नागरिकांना जंगलात न जाण्याचे आवाहन केले होते.तरी माञ परिसरातील नागरिक चुल पेटविण्याकरिता सरपनासाठी जंगलाच्या दिशेने जात आहेत.जंगलात गेल्याशिवाय आमची चुल कशी पेटनार असा प्रश्न परिसरातील नागरिकामध्ये निर्माण झाली आहे.नरभक्षक बिबट्याला त्वरित जेरबंद करण्याची मागणी वारंवार करण्यात येत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close