आनंद निकेतन महाविद्यालयात 3 रे विशेष क्रीडा प्रशिक्षण शिबिर आणि इंटर्नशिप प्रोग्राम चे आयोजन
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
महारोगी सेवा समितीद्वारा संचालित,आनंद निकेतन महाविद्यालय,आनंदवन यांच्या आयुक्त विद्यामाने आणि डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडल ,अमरावती यांच्या सहयोगातून सलग तिसऱ्या वर्षी सुद्धा 3 रे विशेष क्रीडा प्राशिक्षण शिबीर, आनंद निकेतन महाविद्यालयाच्या क्रीडांगनावर दि 15 ते 27 फरवरी 2022 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
शालेय आणि विद्यापीठ स्तरावरील क्रीडा स्पर्धे करीता खेळाडुंची तयारी व्हावी व त्यांना नव नवीन कौशल्य शिकता यावे आणि राज्य, राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जाता यावे तसेच सर्व खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी चालना मिळावी हा या क्रीडा प्रशिक्षण शिबिरा मागिल प्रमुख उद्धेश आहे.या प्रशिक्षण शिबिरात महाविद्यालय व आनंदवन परिवारातील जवळपास 400-500 खेळाडू सहभागी झाले आहेत .
क्रीडा प्रशिक्षण शिबिरात वेगवेगळ्या खेळाचे प्रशिक्षण देण्यात येत आहेत . ज्यामध्ये मल्लखांब, रोप मल्लखांब, अॅथलेटिक्स , कबड्डी, खो खो, सेपक टकरॉ, हँडबॉल,बेसबॉल, नेटबॉल,बॅडमिंटन, बॉल बॅडमिंटन, लॉन टेनिस,फुटबॉल, क्रिकेट,बॉक्सिंग,कुस्ती, जलतरण, बसकेटबॉल, टेबल टेनिस,क्रिकेट,व्हॉलीबॉल,योगा, तायक्वांदो,पॉवर लिफ्टिंग,धनुर्विद्या, अश्या ऐकून 24 खेळाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.प्रशिक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या राज्यामधुन विशेष राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरुष आणि महिला खेळाडू व क्रीडा प्रशिक्षक आले आहे .त्यामध्ये कुस्ती आणि पॉवर लिफ्टिंग साठी बलवान सिंग(जम्मू काश्मीर),बॅडमिंटन आणि फुटबॉल साठी दैमुद्रव बासुमतारी(आसाम),बास्केटबॉल आणि हँडबॉल करिता फयाझ अहमद मलिक(जम्मू काश्मीर),टेबल टेनिस साठी लेकी भूतीया(सिक्कीम),अथलेटिक साठी मैनाओ नारझारी (आसाम)आणि निर्मल मावस्कर(महाराष्ट्र),बॉल बॅडमिंट, बेसबॉल साठी मनेश्वर शर्मा (जम्मू काश्मीर),व्हॉलीबॉल साठी सचिन (उत्तराखंड), सेपक टकरॉ, फुटबॉल साठी ताबा इसाक(अरुणाचल प्रदेश)आणि इरेंगबम चेतन सिंग(मणिपूर),फुटबॉल, व्हॉलीबॉल साठी अभिषेक तमंग(सिक्कीम),धनुर्विद्या साठी बुइता पांडे(झारखंड),खोखो साठी दीपा उईके (महाराष्ट्र),योगा साठी खुशबू कुमारी(झारखंड),तायक्वांदो साठी राजेश मंडल (झारखंड)आणि अंकित कुमार(बिहार),क्रिकेट साठी यशवंत चौहान(उत्तराखंड),फुटबॉल,जलतरण साठी मिर्झा असीम बैग(महाराष्ट्र)आणि प्रयाश चेत्री(सिक्कीम),बास्केटबॉल,क्रिकेट साठी अमन कुमार(झारखंड)कब्बडी साठी शुभंकर सिंग(झारखंड)
हे संपूर्ण क्रीडा प्रशिक्षण शिबिर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे उप प्राचार्य प्रा राधा सवाने यांच्या मार्गदर्शनाखाली शरीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा.तानाजी बायस्कर, श्री तुषार पारखी व सर्व खेळाडूंच्या द्वारा आयोजित करण्यात आले आहे. या क्रीडा प्रशिक्षणाचा फायदा खेळाडू मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने घेत आहे.