ताज्या घडामोडी

मुस्लिम युवक प्रतिष्ठानच्या वतीने बदनापूर तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या थोर स्वातंत्र्य सेनानी व देशभक्त हजरत टिपू सुलतान यांचे नाव मालाड येथील क्रीडा संकुलास देण्यात आल्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलतांना हजरत शहीद टिपू सुलतान यांच्याबद्दल अत्यंत अपमानजनक व चुकीचे असे विधान करून राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे . या द्वेषपूर्ण व अपमानजनक विधानामुळे फक्त मुस्लीम समाजाच्याच नव्हे तर सर्व भारतवासीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत . त्यामुळे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करून कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानच्या वतीने बदनापूर तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे .नसता लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याची इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे . या निवेदनावर मराठवाडा अध्यक्ष. शेख अजहर (बदनापूरकर), जालना जिल्हा अध्यक्ष. हाफिज हारुन पठाण, मिर्झा सफरोज बेग,.युनुस भैय्या, शेख अतीक आतार, सय्यद भिक्कन,
शेख अखबर, मिर्झा कलीम बेग, शेख सोहेल, मिर्झा महेमुद बेग, मिर्झा मुजाहेद बेग, शेख ताहेर तंबोली, समीर बिल्डर, जावेद कुरेशी, काजी इम्रान,अक्रम ईनामदार, सलीम बेग,सय्यद चांद, शेख अरबाज,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close