शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित
प्रतिनिधी: नरेंद्र मेश्राम लाखनी
लाखणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष, देशाचे जाणते राजा, राजकारणाचे सह्याद्री, मा.खा.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लाखनी तालुका व शहरच्या वतीने ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे गरीब, गरजू रुग्णांना ब्लांकेट वितरण करण्यात आले. तसेच लाखनी बस स्थानक येथे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लाखनीचे तालुकाध्यक्ष डॉ. विकासजी गभने, शहराध्यक्ष धनू व्यास, असंघटित कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष नरेशजी इलमकर सर, युवक तालुकाध्यक्ष जितेंद्र बोंद्रे, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष लतीफभाई शेख, लाखनी शहरचे नेते बबलू जी निंबेकर, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुहास बोरकर, निलेश गाढवे, शशिकांत भोयर, दीपकजी लांडगे, सौ विभा हजारे, सौ झलके ताई, मनोज पोहरकर, नरेंद्रजी चोले, अशोक हजारे, सुनील बर्वे, सचिन उके, विजय चाचेरे, अरमान धरमसारे, आरिफ भाई बेग, बोरकर जी उपस्थित होते.