लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारावर तहसीलची कारवाई तर नगराध्यक्ष यांचा कायदाभंग

नगराध्यक्ष अहतेशामअली यांच्यावर कारवाई करा अन्यथा मनसेचे कायदेभंगआंदोलन होणार
तालुका प्रतिनिधी : ग्यानीवंत गेडाम वरोरा
वरोरा शहरात लॉक डाऊन चे कडक निर्बंध असताना काही दुकानदारांनी आपली दुकाने सुरू ठेवल्यानंतर तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी अशा दुकानदारांना धडा शिकविण्यासाठी आज त्यांच्या दुकानाला शील ठोकले होते, मात्र राजकारणाची हवा डोक्यात गेलेल्या व सत्तेचा दुरुपयोग करून नगराध्यक्ष अहतेशाम अली यांनी त्या दुकानदारांना पाठिंबा देत तुम्ही सील तोडा आम्ही तूम्हच्या सोबत आहे असे म्हणून त्यांना तहसीलदार यांच्या आदेशाने जे शील लावले होते ते तोडले अर्थात नगराध्यक्ष अहतेशाम अली यांनी हातात कायदा घेऊन तालुका न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाची अवहेलना करून तो कायदा तोडला आहे त्यामुळे कायदा तोडणाऱ्या नगराध्यक्ष अहतेशाम अली यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी मनसेचे तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांनी केली आहे.
लॉक डाऊन च्या काळात अनेक दुकानदारावर प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली तेंव्हा नगराध्यक्ष अहतेशाम अली कुठे गेले होते? असा सवाल करून सत्ताधारी लोकप्रतिनिधी जर कायदा हातात घेऊन अशा प्रकारे न्यायपालिका व्यवस्थाच पायदळी तुडवत असेल तर मग कायदा हा फक्त सर्वसामान्य जनतेसाठीच आहे का? असा प्रश्न उभा राहतो त्यामुळे या प्रकरणी प्रशासनाने नगराध्यक्ष अहतेशाम अली यांच्यावर त्वरित कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सविनय कायदेभंगआंदोलन करून शासन प्रशासनाचा निषेध करेल असा इशारा मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांनी प्रशासनाला दिला आहे.
नगराध्यक्ष अहतेशाम अली यांचा मॉस्क पण गायब?
एरव्ही सर्वसामान्य नागरिकांनी तोंडावर मॉस्क लावले नाही तर नगरपालिकाद्वारे दंड आकाराण्यात येते मग सार्वजनिक स्थळावर जेंव्हा गांधी चौकातील दुकानांवर कारवाई करण्यात आली व त्याचे नंतर शील तोडण्यात आले तेंव्हा मोठी गर्दी उसळली होती तेंव्हा नगराध्यक्ष अहतेशाम अली यांच्या तोंडावर मॉस्क नव्हते मग त्यांच्यावर दंड कुणी करायचा असा प्रश्न उभा राहत आहे.