ताज्या घडामोडी
शिवसेनेच्या वतीने घनसावंगी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
घनसावंगी शहरातील छत्रपती शिवाजी नगर , अहिल्या चौक, शिवसेना संपर्क कार्यालय नगर पंचायत कार्यालय येथे प्रतिमेस पुष्पहार घालून व नागरिकांना मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला व त्यानंतर शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळवाटप,रुग्ण सेवा देणारे डॉक्टर व नर्स यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मुजाहेद अली खान, सचिन अप्पा देशमुख, फैय्याज खाॅन , देवनाथ जाधव, विष्णू जाधव, पांडुरंग साळवे, रमेश दशरथ, विठ्ठल सुराशे, विष्णू सुराशे, विष्णू जाधव ,मोहन दशरथ व शहर भीमराव वैराले , सुमित गवारे, अशोक खंडागले, हनुमान गवारे व तालुक्यातील सर्व मान्यवर शिवसैनिक उपस्थित होते.