करंजी येथे दुचाकीचा अपघात
एक ठार; एक जखमी
तालुका प्रतिनिधी:महेश शेंडे
गोंडपिपरी
गोंडपीपरी तालुक्यातील करंजी येथे आज दि.29 जानेवारी रोज शनिवारला सांयकाळी 5 वाजताच्या दरम्यान दुचाकीने बॅरिकेटस ला जोरदार धडक दिल्याने सदर अपघात झाला.
यात एक ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली आहे.
मृतकाचे नाव रविंद्र उर्फ रवी खाडे वय 57 वर्ष रा.कोठारी याचा मृत्यू झाला असून संदीप उर्फ बालु लोनगाडगे रा.कोठारी वय 39 वर्ष हा जखमी झाला आहे. जखमीच्या हाताला दुखापत झाली आहे.
ते दोघे दुचाकी वाहनाने गोंडपीपरी येथून कोठारीला जात होते. दुचाकी रवी खाडे चालवत होता तर संदीप मागे बसून होता.
करंजी येथे लावलेल्या बॅरिकेटला दुचाकीने जोराची धडक दिल्याने ते दोघेही कोसळले घटनेची माहिती होताच गोंडपीपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार घटनास्थळी हजर झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे दाखल करण्यात आले असता
रवी खाडे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.मृतक हा कोठारी ग्रामपंचायत चा माजी उपसरपंच राहिल्याची माहिती आहे.
पुढील तपास गोंडपीपरी पोलिस करीत आहेत.