संततधार पावसामुळे पेढी नदीला महापूर आल्याने कुंड खुर्द येथील पुलाचे एक साईड पूर्णपणे गेली पाण्यात वाहत
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
अमरावती जिल्हा सह भातकुली तालुक्यात रविवारी रात्री व सोमवारी सकाळी झालेल्या सततधार पावसामुळे पेढी नदीला आलेल्या महापुरामुळे कुंड , खुर्द,अळनगाव , गोपगव्हान वासेवाडी,, इत्यादी बरेच गावाला ये जा करन्या करीता
कुंड खुर्द येथील पेढी नदिच्या पात्रात बांधलेला पुल+बंधारा या पुलावरून सतत चार ते पाच गावांतील शाळेतील विद्यार्थी चंद्रभान जी विद्यालय कुंड स येथे शिक्षणासाठी येतात व या चारही गावाची बाजारपेठ हे अमरावती असल्याने समस्त नागरीकांना याच पुलावरून ये जा करावे लागते त्याच पुलावरची कुंड खुर्द कडील बाजु पुर्ण पने वाहत गेली या आदि 6/7/2022रोजी बडनेरा मतदार संघाचे आमदार रवि भाऊ यांना यांनी पाहुनी केली व भातुकली तहसीलदार म्याडम निता लबडे, अळनगाव येथील सरपंच गौतम खंडारे, गणेश सिंग चव्हान राजेंद्र सिरसाठ कुंड खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य अतुल मेश्राम , राजेश सुरवे पोलीस पाटिल कुंड खुर्द आरोग्य सेविका मकेक्ष्वर म्याडम कुळमेथे साहेब आदिनी पाहनि केली होती व आमदार रवि राणा यांनि लगेचच आजच्या आजच तुम्हाला ते जा करण्याचा रस्ता मोकळा करून देतो असे आक्ष्वासन गावकरी लोकांना दिले होते परंतु बडनेरा मतदार संघाचे आमदार रवि राणा यांचे आश्वासन शंभर टक्के खोटे ठरले शेवटी काल आलेल्या माहापुराने पन मागच्या सारखिच गति झाली . गावातील लोकांना समजुन चुकले की आपला रस्ता आपल्यालाच करावा लागणार या हेतूने गावातील मुल व वृद्ध लोक यांनी एकमत करून आपला रस्ता ये जा करण्यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांना ,लोकांना आपल्या स्वतःच्या घरातील घमेले पावडे घेऊन, नदी पुलावर येऊन आपल्या कामाला सुरुवात केली व ते जा करण्याचा रस्ता मोकळा केला. कुंड खुर्द येथील नागरिक आबा रावजी इंगोले ,चंदन देशभ्रतार, राहुल जंजाळ ,राजेंद्र राऊत, आकाश इंगोले, अक्षय राऊत, दिलीप इंगोले, प्रशांत तायडे, सुनील मोहोड, जितू सुर्वे ,या सर्वांनी मिळून पंधरा ते वीस फूट खोलदरीतून बकेट व दोरीच्या साह्याने मुरूम व गिट्टी उचलून येण्या जाण्यासाठी रस्ता मोकळा केला.