ताज्या घडामोडी
विविध मागण्या संदर्भात कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मराठा समाजाचे वसतिगृह तात्काळ चालू करणे , पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना तात्काळ देणे , अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व संचालक मंडळ स्थापन करून महामंडळास गती तात्काळ देणे, मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करणे, सारथी संस्थेसाठी भरीव निधी देणे या मराठा समाजाच्या विविध मागण्या संदर्भात कॅबिनेट मंत्री अतुल जी सावे साहेब यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष नितीन भैया देशमुख महानगर अध्यक्ष गजानन जोगदंड,किशोर रणेर मराठा क्रांती मोर्चा समन्वयक बालाजी मोहिते जिल्हाप्रमुख, मराठा सेवा मंडळाचे मंगेश भरकड, दक्षता समिती सदस्य अनिताताई सरोदे, स्वप्निल गरुड, नितीन जाधव उपस्थित होते.