अवैध धंद्यांच्या विरोधात युवा सेनेचे निवेदन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी शहर आणि तालुक्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करा… अन्यथा तीव्र आंदोलन युवा सेनेच्या माध्यमातून छेडल्या जाईल….
आज युवासेनेचा वतीने पाथरी पोलीस स्टेशन येथे जाऊन पाथरी शहर व तालुका येथील सुरू असलेली हातभट्टी दारू गांजा तस्करी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये होणारी छेडछाड व्हाइटनर ची नशा असे अनेक प्रकारच्या विविध धंदे तात्काळ बंद करा या मागणीचे निवेदन पाथरी पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले हे अवैध धंदे बंद नाही केले तर युवा सेनेचा वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवा सेना जिल्हा प्रमुख अमोल भाले पाटील यांच्या कडून देण्यात आला.
यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख अमोल भालेपाटील, उपजिल्हाप्रमुख गोपाळ भाऊ साखरे पाटील, ताजू बाबा फारोकी,प्रताप शिंदे, उत्तमराव झिंजुर्डे ,युवा सेना उपतालुकाप्रमुख नारायणजी दळवी यावेळी उपस्थित होते.