भारत देशाचे पहिले थोर स्वतंत्र सेनानी टिपू सुलतान यांच्या बद्दल अपमान जनक वक्तव्य करणाऱ्या देवेंद्र फडवणीस यांच्या विरुद्ध कडक कारवाई करा -टिपू सुलतान जयंती उत्सव समिती धारूर
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
धारूर शहरातील टिपू सुलतान जयंती उत्सव समितीच्या वतीने देवेंद्र फडवणीस यांचे निषेध करुन धारूर तहसीलदार मार्फत मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब,
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई.,
मा. जिल्हाधिकारी साहेब बीड.
यांना निवेदन देऊन देवेंद्र फडवणीस याच्या विरुद्ध कडक कारवाई करा असे निवेदन देण्यात आला निवेदनात म्हटले आहे की भारत देशाचे पहिले थोर स्वतंत्र सेनानी, पहिले मिसाईलमॅन इंग्रजांचे कर्दनकाळ , महान शासक , लोकहितवादी , लोककल्याणकारी न्यायप्रिय सर्व समावेषक राजा महान स्वतंत्र सेनानी तसेच भारत देशासाठी इंग्रजांविरूध्द लढतांना शहीद होणारे अखंड भारताच्या प्रेरणा स्त्रोत आणि अभिमान आहे, अशा भारत मातेच्या वीर पुत्र टीपू सुलतान यांच्या बद्दल अपमानजनक व द्वेषपूर्वक विधान करून राज्यातील शांतता कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणारे देवेंद्र फडवणीस यांच्यावर योग्य अशी कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा टिपू सुलतान जयंती उत्सव समिती याच्या तर्फे नगर सेवक शेख गफार, इंजी. सादेक इनामदार, अँड. सय्यद साजेद, सय्यद रज्जाक, शेख अकरम भाऊ, शेख शाहेद, अँड. शेख शादाब, मुनीर निरखी, सय्यद सादेक, कलीम कुरेशी, शेख खाजा, शेख आयुब, समीर पठाण, इर्शाद मोमीन, शेख महंमद,शाहबाझ पठाण, शेख निसार, आझाद पठाण,शेख एजाज, राजू मोमीन, व टिपू सुलतान जयंती उत्सव समिती यांच्या वतीने दिला आहे.