खऱ्या आदिवासींना लाभ देण्यात यावा अशी जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम यांची प्रकल्प अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी
मुख्य संपादक :कु.समिधा भैसारे
जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम यांची मागणी
खावटी अनुदान योजना लाभार्थी निवड यादी मध्ये गैर आदिवासी लाभार्थी नावांची यादी वगळून खऱ्या आदिवासींना लाभ देण्यात यावा अशी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद,नागपूर विभाग ची प्रकल्प अधिकारी यांना मागणी. कोरोना मूळे संकटात सापडलेल्या आदिवासी बांधवांना दिलासा मिळावा म्हणून राज्य शासनाने खावटी अनुदान योजना जाहीर केली. मात्र प्रकल्प अधिकारी,कार्यालय मार्फत लाभार्थी निवड यादी तयार करताना आदिवासी नसलेल्या अन्य गैर आदिवासी लोकांचा समावेश केला आहे अश्या तक्रारी संघटनेस प्राप्त झाल्या आहेत.यामुळे खरा आदिवासी समाज योजने पासून वंचित राहून त्यांच्यावर अन्याय होणार आहे,असे प्रकार प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून होत असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे. प्रकल्प अधिकारी कार्यालय कडून चौकशी करून माहिती मागविण्यात यावी जर अधिकारी/कर्मचारी यांचे चुकीमुळे गैर आदिवासी लोकांच्या खात्यात अनुदान रक्कम जमा झाली असल्यास ती रक्कम जबाबदार अधिकारी/कर्मचारी यांच्या वेतन मधून वसूल करून खऱ्या आदिवासी लाभार्थ्याची निवड करून त्यांना देण्यात यावी.केलेल्या कार्यवाहीची माहिती संघटनेस कळविण्याची तसदी घ्यावी अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद,नागपूर विभाग तर्फे प्रकल्प अधिकारी श्री. वाहने यांना निवेदनाद्वारे केली यावेळी परिषदेचे जिल्हाध्यक्ष, राहुल मेश्राम, दिनेश शेराम,स्वप्नील मसराम,,सुरेंद्र नैताम,विजय परतेकी,राहुल मडावी उपस्थित होते. !!!