मानवत येथे रमजान ईद उत्साहात साजरी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत शहरातील उक्कलगाव रोड येथील मोठी ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांनी सामूहिकरित्या एकञित जमा होऊन ईदुलफिञ अर्थात रमजान ईद ची नमाज दि.३ मे रोजी पठण करुन ईद ऊत्साहात साजरी करण्यात आली .
रमजान ईद निमित्त शहरातिल छोटि ईदगाह येथे सकाळी साडे आठ वाजता तर मोठि ईदगाह येथे नऊ वाजता नमाज चे आयोजन करण्यात आले होते मोठि ईदगाह येथे मुस्लिम बांधवानी मोठ्या ऊत्साहात नमाज साजरी करुन एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या ईदची नमाज मुस्लीम धर्मगुरु मुफ्ती मोहम्मद ईसाक यांनी पठण केली तर नमाज नंतर प्रार्थना मौलाना मुजाहिद यांनी केली व भारतात सुख शांतता व धार्मिक एकात्मता वाढावी यासाठी अल्लाह कडे प्रार्थना केली
नमाज नंतर नगरपरिषद कर्मचारी व पोलीस प्रशासनाच्या वतीने गुलाब पुष्प नागरीकांना देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या ईदगाह मैदान येथे आजाद झार सेटरच्या वतीने नागरीकांना पाणी वाटप करण्यात आले तसेच शहरातील राजकिय व सामाजिक संघटनाच्या वतीने रमजान ईदचे शुभेच्छा फलक लावुन शुभेच्छा देण्यात आल्या मानवत पोलीस निरीक्षक संजय करनूर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मौलाना मुजाहिद यांनी नगरपरिषद व पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले.