ग्रामविकासात महिलांनी सहभाग वाढवावा

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे प्रतिपादन
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
ग्रामीण भागात आज देखील मोठ्या प्रमाणात पुरुषांचा हाती सत्ता असल्याचे आपल्याला दिसते. परंतु आज परिस्थिती बदललेली आहे. महिला देखील उच्च शिक्षित झाल्या आहे. गाव विकास आढावा करण्यात महिलांनी पुढाकार घेतल्यास गाव विकासात पुढे नेण्यास सहकार्य होणार आहे. त्यामुळे ग्रामविकासात महिलांचा सहभाग वाढविण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर याची केली.
वरोरा तालुक्यातील टेमुर्डा व पांझुर्णी येथे हळदी कुंकू व स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
पांझुर्णी येथे यावेळी उपसभापती पंचायत समिती वरोरा संजीवनी भोयर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनंदा जीवतोडे, बोर्डा सरपंच यशोदा खामणकर, पांझुर्णी सरपंच निर्मला दडमल, उपसरपंच अर्चना मोडक, सरपंच चंद्रकला वनशिंगे, सरपंच जयमाला भोयर, सरपंच शालूताई उताणे, सरपंच मंगला लेवाडे, सरपंच मनीषा ठेंगणे, उपसरपंच सुरेखा लभाने, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष सारीका धाबेकर,जयश्री मोरे, भरती काळे, साधना कुंभे तर टेमुर्डा येथे सरपंच सूचिता ठाकरे, उपसरपंच वाटोळे, माजी सरपंच संगीत आगलावे, माजी सरपंच संगीत पाकमोडे, सरपंच वैशाली देरकर, मंगला पातुरकर, पोलीस पाटील शोभाताई चंदन बटवे, जान्हवी बैस, आशा पाकमोडे, कल्पना चिंचोलकर, ताईबाई गाते, दुर्गाताई गाते, दिशा गाते, पार्वता वरारकर, उज्वला नक्षीने यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या कि, गावाचा विकास करण्यात मुख्य भूमिका महिलांची असली पाहिजे. आर्थिक दृष्ट्या सक्षम बनण्याकरीता बचतगटाच्या माध्यमातून त्यांनी आत्मनिर्भर बनावे. त्याकरिता पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.