युवराज छत्रपती संभाजीराजे 19 व 20 रोजी परभणीत
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पूर्णा व वझुर् येथे स्वराज्य संघटनेच्या सभांचे आयोजन.
स्वराज्य संघटनेच्या शाखा उद्घाटन दौऱ्याच्या निमित्ताने गावोगावी बैठकांचे आयोजन.
स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वराज्य संकल्प अभियान परभणी जिल्हा दौऱ्याच्या अनुषंगाने कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी गावोगावी आढावा बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.
देवठाणा, माखणी खांबेगाव कानेगाव ममदापूर मजलापुर खुजडा सुहागन बरबडी आहेरवाडी कातनेश्वर गणपुर गोळेगाव ,मुंबर,लिमला, दस्तापुर मझलापुर, देऊळगाव, वजुर, झाडगाव, ताडकळस,सायाला, टाकळगव्हाण, ताडलिमला,पूर्णा,येथे बैठका झाल्या असून २० नोव्हेंबर रोजी या गावांत छत्रपती संभाजी महाराजांच्या हस्ते शाखा उद्घाटन करण्यात येईल. यावेळी प्रमूख उपस्थीती राज्य प्रवक्ते करण गायकर, राज्य निमंत्रक माधव देवसरकर, व गंगाधर नाना काळकुटे यांची राहील
व सभेच्या नियोजनाची पाहणी व आलेल्या सर्व मान्यवरांच्या दुपारच्या जेवणाचे स्थळ पाहणी करण्यात आली आहे
स्वराज्य संघटनेचे चे निमंत्रक नितीन देशमुख, शिवराज जोगदंड,. पूर्णा तालुका निमंत्रक साहेबराव कल्याणकर, माधव आवरगंड, सचिन आवरगंड, मंगेश कदम,चंद्रकांत पवार ,मारुती पवार ,व स्थानिक अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.