व्यंकटराव जाधव यांचा जाहीर सत्कार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खडाळा येथील मुख्याध्यापक व्यंकटराव जाधव यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा सहसचिव पदी निवड झाल्याबद्दल भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी गावचे सरपंच उत्तमराव शिंदे उपसरपंच कुंडलिकराव शिंदे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालाजी शिंदे सदस्य शिवराम शिंदे माजी अध्यक्ष कैलासराव शिंदे आदींची उपस्थिती होती.
सत्काराला उत्तर देताना व्यंकटराव जाधव म्हणाले की शिक्षकांच्या सर्व प्रश्नांना सोडविण्यासाठी संघ व मी कटिबद्ध आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास सुरवसे यांनी केले तर आभार
श्री राहुल काऊतकर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक पांडुरंग मोरे, ज्ञानेश्वर साखरे, वर्षा पाटील आणि प्रा.किशोर उघडे यांनी परिश्रम घेतले.