आमदार बंटी भाऊ भांगडीया नेरीच्या विकासकामासाठी अग्रेसर
स्थानिक विकास निधी मधून मंजुरीसाठी दिले पत्र.
ग्रामीण प्रतिनिधी :रामचंद्र कामडी नेरी
येथील विकास कामाकरिता आमदार बंटी भाऊ भांगडीया यांनी माननीय जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय यांना मंजुरीसाठी पत्र दिले. नेरी हे गाव लोकसंख्येने मोठे असून यात एकूण सहा वार्ड आहे. प्रत्येक वॉर्डाचा विकास होणे गरजेचे आहे. त्यात उन्हाळ्यात नेरी येथे पाण्याची बिकट समस्या असून वार्ड क्रमांक पाच मधील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. त्यात ग्रामपंचायत कडून एक-दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. या वार्डातील लोकांची पाणी समस्या लक्षात घेऊन माननीय बंटी भाऊ भांगडीया यांनी नेताजी वार्ड क्रमांक पाच मधील हातपंप व सोलर पॅनल उभारणीसाठी तीन लाख रुपये व याच वार्डात बौद्ध विहार परिसरात सामाजिक वाचनालय बांधकामासाठी सभागृह निर्मिती करणे यासाठी पाच लाख रुपये चिमूर विधानसभा जिल्हा चंद्रपूर क्षेत्रातील चिमूर तालुक्यातील नेरी अंतर्गत विकास कामाकरिता स्थानिक विकास निधी 2021- 22 अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरीसाठी माननीय कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर व माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागभिड ,जिल्हा चंद्रपूर या यंत्रणेने द्वारा अंदाजपत्रके मागवून अंतिम मंजुरीसाठी पत्रव्यवहार केलेला आहे त्यामुळे जनतेच्या वतीने डॉक्टर श्यामजी हटवादे (महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा) यानी आभार मानलेले आहे.