ताज्या घडामोडी
अमरपुरी गावातील रोजगार सेवकाची गावकऱ्यांनी केली तक्रार : अध्याप चौकशी नाही
ग्रामीण प्रतिनिधी:चंदन पाटील खडसंगी
अमरपुरी येथील रोजगार सेवक विकास रणदिवे जॉबकार्ड काढण्याकरिता तसेच इ मस्तुड टाकण्याकरिता अवास्तव पैशाची मांगणी करतॊ, तसेच कामावर न जाणाऱ्यांच्या नावानेसुद्धा पैशाची उचल केल्याची तक्रार अमरपुरी येथील कष्ठकरी गावकरी यांनी ग्रामपंचायत ला डिसेंम्बर 2021 ला केली होती. त्यावर ग्रामपंचायत कडून पंचायत समिती ला तक्रार करा अशी सूचना करण्यात आली. जानेवारी 2022 ला संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती चिमूर ला तक्रार करण्यात आली. दोन महिने उलटूनही या तक्रारीनुसार काहीच चौकशी व कारवाही करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना न्याय मिळाला नाही.
अमरपुरी चे नागरिक अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.