गोंडपिपरी तालुक्यातील तारसा बूज येथील कलावंत ताराचंद उराडे यांच्या उपचारा दरम्यान मृत्यू
शहर प्रतिनिधी :प्रमोद दुर्गे गोंडपीपरी
गोंडपीपरी तालुक्यातील मौजा तारसा बूज येथील रहीवाशी ताराचंद उराडे यांचा आज दि.12 आगस्ट रोज गुरवारला नागपूर येथील मेडिस्ट्रीना हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
मागील काही दिवसांपूर्वी त्याना डेंग्यू ची लागण झाली होती.उपचारा साठी चंद्रपूर येथील नगराळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.पण त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होत नसल्याने स्वेता हास्पिटल चंद्रपूर येथे हलविण्यात आले होते. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होतच नसल्याने त्यांना
नागपूर येथील मेडीस्ट्रीना हॉस्पिटलमध्ये रेफर करन्यात आले व तिथे त्याच्यावर उपचार सुरू होते. अश्यातच उपचारादम्यान गुरवारला सकाळी 8 वाजता त्यांची प्राणज्योत मावळली.
आंबेडकर चळवळीचे सुवाहक,जेष्ठ रंगकर्मी,उत्कृष्ठ नाटककार,कलावंत आणि चित्रकार म्हणून त्यांची ख्याती होती.
त्याच्या पच्यात पत्नी , मुलगा, मुलगी, असा मोठा आप्तपरिवार आहे. त्याच्या अश्या अवेळी निघून जाण्याने उराडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.