ताज्या घडामोडी

बानेगांव सोसायटीच्या सर्व संचालकाची निवड बिनरोध


पाथरी तालुक्यातील बानेगांव सोसायटीच्या सर्व संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यासाठी विशेषत्वाने मार्गदर्शन केल्याबद्दल नवनिर्वाचित सदस्य व पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नारायणराव आढाव यांनी आमदार बाबाजाणी दुर्राणी यांचा सत्कार केला त्याप्रसंगी घेतलेले छायाचित्र…

आमदार बाबाजाणी यांचे नेतृत्व.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथरी कृऊबास संचालक नारायणराव आढाव यांची एकहाती सत्ता.

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी तालुक्यातील बानेगांव येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या सर्व संचालकांची निवड बिनविरोध झाली असल्याचे निवडणूक निर्वाचन अधिकारी एल.एस बावसकर यांनी जाहीर केली असुन आमदार बाबाजाणी दुर्राणी यांचे नेतृत्वाखाली हि सोसायटी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठेवण्यात पाथरी कृऊबासचे संचालक नारायणराव आढाव यशस्वी झाले आहेत.
बानेगांव येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने निवडणूक निर्वाचन अधिकारी एस.एल.बाचावार यांनी येथील निवडणूक प्रक्रिया सुरू केली.त्यानंतर राजकीय घडामोडी सुरू झाल्या पण १५ वर्षापासून हि सोसायटी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असुन यावेळी ही ती ताब्यात ठेवण्यासाठी आमदार बाबाजाणी दुर्राणी यांचे मार्गदर्शनाखाली पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नारायणराव आढाव यांनी योग्यपध्दतीने रणणनीती आखली आणि अर्ज मागे घेणे च्या अखेरच्या दिवशी १३ संचालक निवडीसाठी १३ उमेदवार यांचे नामनिर्देशन राहील्याने ते यशस्वी झाले.
निवडणूक निर्णय अधिकारी एस.एल.बाचावार यांनी शुक्रवारी बिनविरोध नवनिर्वाचित संचालक मंडळ मंडळाचा निकाल जाहीर केला.याप्रसंगी पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांनी सर्व संचालकांचा सत्कार केला.या संचालक मंडळात रामभाऊ विठ्ठल लाहे, बन्सी आश्रोबा काठवडे, परमेश्वर उत्तमराव आढाव, विठ्ठलराव सुंदरराव आढाव, नवनाथ केशव नाईकवाडे,बाबासाहेब सर्जेराव सावंत,कृष्णा दादाराव आढाव,संदीपान अंकुश कातारे, विजूबाई सुधाकर सावंत, कुशावर्ता भगवान मुजमुले, सुधाकर पंडीतराव देवणे, अंगद नागोराव काळे, बालासाहेब धोंडीबा पंडीत यांचा सामावेश आहे.
आमदार बाबाजाणी दुर्राणी यांनी सोसायटीच्या निवडणूक प्रक्रियेत विशेषत्वांने लक्ष देऊन मार्गदर्शन केल्याबद्दल सर्व संचालक मंडळाच्या वतीने आमदार बाबाजाणी दुर्राणी यांचा सत्कार करण्यात आला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close