ताज्या घडामोडी

डॉ बाबासाहेब आंबेडकर जगासाठी प्रेरणादायी समतेचे विद्यापीठ आहेत -समतादूत प्रज्ञा राजुरवाडे

मुख्य संपादकःकु.समिधा भैसारे

डॉ बाबासाहेब आंबेडकर हे केवळ व्यक्ति नसून ते समाजीक समतेचा विचार आहेत ज्यांचा समता स्वांतत्र्य न्याय आनी बंधूता या तत्वावर विस्वास आहे अश्या संपुर्ण जगासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर हे समतेचे विद्यापीठ जिवन जगन्याचे प्राणवायू आहेत असे प्रतीपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर सशोधंन व प्रशिक्षन संस्था बार्टि च्या समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी सम्राट अशोक विस्वशांती बौद्ध विहार जाम्भूळघाट येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना आपल्या प्रमुख मार्गदर्शनात बोलत होत्या या कार्यक्रमाचे अद्यक्ष हरीचंद्र पाटिल माजी सैनिक हे होते तर प्रमुख अतिथी दखल न्यूज़चे एकनाथ गोंगले, किरण गोंगले प्रा.दीक्षान्त रामटेके,ग्रा.सदस्य निता रामटेके संजना खोब्ररागडे हया उपस्थीत होते पुढे बोलताना समतादूत प्रज्ञा राजुरवाडे म्हणाल्या की बाबासाहेबांचा जिवनसंगर्ष हा सामाजीक समतेसाठी पिडीत वंचित दडपलेल्या सर्व समाजाच्या आत्मसन्मासाठी लोकशाहि बळकट होन्यासाठी होता डॉ बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी विरोधी पक्षाचे अस्तितव शक्तीशाली असावे असा इशारा सविधान सभेतिल शेवटच्या भाषनात देतात नितीमान समाज व्यव्यस्थेची अत्यावश्यकता बाबासाहेबाना अपेक्षित होती जातीवीहिन वर्णविहिन बुधिवादी समतावादी समाजाचे स्व्प्न पाहनार्या बाबासाहेबाचे विचार कृतित उतरवीने गरजेचे आहे लोकशाही बळकट करायची असेल तर तुमचे मत वाया गेले तरी चालेल पन येत्या निवडणुकीत आपले मते विकू नका

कूठल्याही राजकीय प्रलोभणाला बळी पडू नका आपला खरा नेता कोन आहे हे ओळखन्याची आज गरज आहे राजकीय पक्ष छोटा असला तरी चालेल पन तो विरोधीपक्ष सक्षम वंचित समाजाचा आवाज हवा म्हनुन प्रतेक गावातुन फुले शाहू आंबेडकरांच्या समतेचा आवाज ससंदेत पोहचला पाहिजे हीच ड्रा बाबासाहेबांना खरी आदरांजली होयिल आज समाजानी खुप प्रगती केली आहे समाजाचा अनमोल दागीना बौद्ध विहारे आहेत समाजाची सामाजिक आर्थिक शैक्षणिक राजकिय प्रगती कशी होयिल समाजाच्या विनयशीलतेचि प्रतिमा कशी उंचावेल यावर प्रतेक बौद्ध विहारात चर्चा हवी समाजात शिस्थब्धता हवी मान सन्मान पदे सघटना यांची अपेक्षा बाळगू नका ड्रा बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातिल सर्वात सत्य मौल्यवान सशोधन आपणास दिले आहे ते म्हणजे 22 प्रतिज्ञा होय त्यांचे पालन करा व इतरानाही सांगा मुलाना मुलीना उच्च शिक्षण द्या प्रतेक बौद्ध विहारात भारतिय सविधान वाचनाचा कृती कार्यक्रम राबवावा आपल्या न्याय हक्काविषयी कर्तव्याविषयी जागृती असायला हवी असे स्विस्तर मार्गदर्शन यावेळी समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धणराज खोब्ररागडे यांनी केले यावेळी बहूसंख्य बौद्ध उपासक व उपाशीका हजर होत्या.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close