आनंद निकेतन महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा संपन्न

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
वरोरा-गेली अनेक वर्षे आनंद निकेतन महाविद्यालयात संपन्न होणारी स्व. इंदिरा बाई जनार्दनपंत देशपांडे स्मृती आंतर महाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धा याही वर्षी 29 मार्च 2022 ला महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती.चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास अकरा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. ऑनलाइन शिक्षण हे आपल्या शिक्षण व्यवस्थेस तारक आहे की मारक! या विषयावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रो.डॉ. अरविंद सवाने हे होते तर परीक्षक म्हणून लोकमान्य टिळक वणी कॉलेजचे डॉ.रवी मत्ते व डॉ.पटेलपाईक यांनी व सेंट अनिस शाळेच्या शिक्षिका सौ.मोहिनी भोंगळे यांनी काम पाहिले.
या स्पर्धेचे समालोचन लोकमान्य टिळक महाविद्यालय वणीचे प्रा.डॉ.रवी मत्ते यांनी केले. याप्रसंगी बोलताना त्यांनी या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि या स्पर्धेला परीक्षक म्हणून येता आले याचा आनंद व्यक्त केला.सेंट अनिस स्कूल च्या सौ.मोहिनी भोंगळे यांनी या स्पर्धेचे, या स्पर्धेच्या विषयाचे आणि विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे मांडलेल्या मतांचे कौतुक केले आणि परीक्षकांच्या वतीने आभार मानले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्रो.डॉ.सवाने सर म्हणाले की,” उत्क्रांत होण्याकरता बदल आवश्यक असतो. निसर्गही बदलत असतो आणि त्यामुळे कदाचित शिक्षण पद्धती सुद्धा उत्क्रांत होत असावी”.आणि शिक्षण मग ते ऑनलाईन असो की ऑफलाइन ते समाजपरिवर्तनाचे सर्वोत्तम साधन असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं या स्पर्धेत श्री.प्रलय मशाखेत्री,सर्वोदय महाविद्यालय गोंडपिपरी कॉलेज, श्री.अनिकेत दुर्गे,स्व.सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालय चंद्रपूर व श्री.आकाश कडुकर, शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय चंद्रपूर यांना अनुक्रमे प्रथम,व्दितीय व तृतीय पारितोषिक मिळाले.तर उत्तेजनार्थ पारितोषिक कु. तृप्ती राजूरकर, आनंदनिकेतन महाविद्यालय
आनंदवन,श्री.पंकज चावला शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय चंद्रपूर व श्री.सिद्धार्थ चव्हाण डॉ.आंबेडकर कॉलेज चंद्रपूर यांना मिळाले.फिरता चषका चे मानकरी ठरले शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय चंद्रपूर .
या स्पर्धेचे प्रास्ताविक या स्पर्धेचे संयोजक असणारे प्रा.अरविंद बरडे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्पर्धेच्या नियमांचे वाचन प्रा. मोक्षदा मनोहर -नाईक व आभार प्रदर्शन प्रा.बबन अवघड यांनी केले.स्पर्धेच्या वेळेच्या नियोजनाची जबाबदारी प्रा.मनोहर चौधरी यांनी सांभाळली. प्रा.डॉ.संयोगीता वर्मा,प्रा.तिलक ढोबळे,प्रा.सुनीता वारे,प्रा.हेमंत परचाके यांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.प्राचार्य डॉ.मृणाल काळे यांच्या मार्गदर्शनात ही स्पर्धा अतिशय उत्साहात संपन्न झाली.